ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

एकात्म भारताचा आध्यात्मिक ध्वज

दि.०१ नोव्हेंबर १९५४

(श्रीअरविंदांनी ज्याला ‘एकात्म भारताचा आध्यात्मिक ध्वज’ असे म्हटले होते त्या ध्वजाची मूळ संकल्पना श्रीमाताजींची आहे. निळ्या रंगाच्या चौरसाकृतीच्या मध्यभागी सुवर्णरंगातील श्रीमाताजींचे बोधचिन्ह हे त्या ध्वजाचे स्वरूप आहे.)

श्रीमाताजींनी त्यासंबंधी दिलेला संदेश असा : “आज ०१ नोव्हेंबर, आमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा दिवस आहे. आमच्याकडे एक ध्वज आहे ज्याला श्रीअरविंद यांनी ‘एकात्म भारताचा आध्यात्मिक ध्वज’ असे संबोधले आहे. त्याचा चौरस आकार, त्याचा रंग आणि त्यावरील प्रत्येक तपशील यांना एक प्रतीकात्मक अर्थ आहे. भारत स्वतंत्र झाला तेव्हा म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ रोजी त्याचे ध्वजारोहण झाले होते. आता या फ्रेंच वसाहती भारताबरोबर एकसंघ झाल्यामुळे, ०१ नोव्हेंबर १९५४ रोजी परत ध्वजारोहण करण्यात येईल. भविष्यात जेव्हा जेव्हा भारत स्वतःचे भूभाग पुनर्प्राप्त करेल तेव्हा तेव्हा असे ध्वजारोहण केले जाईल. या जगामध्ये एकात्म भारताला एक विशेष कामगिरी पूर्ण करायची आहे. श्रीअरविंदांनी स्वत:चे समग्र जीवन त्यासाठी व्यतीत केले आणि तेच करण्यासाठी आम्हीसुद्धा कटिबद्ध आहोत.”

एका प्रसंगी बोलताना श्रीमाताजी म्हणाल्या होत्या, ”आमच्यासाठी हा ध्वज म्हणजे पुनरुज्जीवित, एकात्म आणि विजयी भारताचे प्रतीक आहे. असा भारत, जो गुलामगिरीची सारी बंधने झुगारून, शतकांची निद्रा झटकून जागा होत आहे, पुन्हा एकदा एक महान आणि एकात्म भारत म्हणून तो उदयाला येणार आहे, त्यासाठी नवजन्माच्या साऱ्या यातनाही त्याने सोसल्या आहेत, अशा भारताने आत्म्याच्या सर्वश्रेष्ठ आदर्शाकडे जगाला घेऊन जायचे आहे.”

निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर सुवर्ण रंगातील बोधचिन्ह या विषयी बोलताना त्या म्हणाल्या, “भारताच्या आध्यात्मिक जीवनकार्याचा हा ध्वज आहे आणि या जीवनकार्याच्या परिपूर्तीमध्येच भारताची एकात्मता साध्य होणार आहे.”

– श्रीमाताजी (CWM 13 : 354; 12 : 260; 13 : 352)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

भारताच्या नागरिक श्रीमाताजी

  दि. १५ ऑगस्ट १९५४ भारताचे नागरिक होण्याची, दीर्घकाळ मनात जपलेली माझी इच्छा फलद्रूप होण्याचा…

1 day ago

सत्याचा मानदंड

  दि. २५ एप्रिल १९५४ श्रीअरविंदांचे आपल्या मातृभूमीवर नेहमीच अगाध प्रेम होते. भारतभूमी महान, उदात्त,…

2 days ago

सत्याचे आगमन

फेब्रुवारी १९५४ भारताचे आणि जगाचे संरक्षण करण्यासाठी सामंजस्यपूर्ण इच्छाशक्ती आणि आध्यात्मिक ज्ञान यांच्या आधारे घडण…

3 days ago

देशसेवा

  ऑक्टोबर १९४८ प्रामाणिक, धैर्यवान, सहिष्णू आणि सत्त्वनिष्ठ राहून तुम्ही तुमच्या देशाची सर्वोत्तम सेवा करू…

4 days ago

भारताची अग्निपरीक्षा

  दि.०३.०६.१९४७ (भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड लुईस माऊंटबेटन यांनी ०२ जून १९४७ रोजी रेडिओवरून एक भाषण…

5 days ago

एक महान निर्णायक वळण

  (सन १९१८) सध्याचा काळ असा आहे की जेव्हा, अखिल जगाप्रमाणेच भारतासाठीसुद्धा, त्याची भावी नियती…

1 week ago