ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

भारताच्या नागरिक श्रीमाताजी

 

दि. १५ ऑगस्ट १९५४

भारताचे नागरिक होण्याची, दीर्घकाळ मनात जपलेली माझी इच्छा फलद्रूप होण्याचा आजचा हा दिवस आहे. १९१४ साली जेव्हा मी प्रथम भारतात आले होते तेव्हापासून मला हे जाणवते की, भारत हाच माझा खरा देश आहे; माझ्या जिवाचा, माझ्या आत्म्याचा देश आहे. जेव्हा भारत स्वतंत्र होईल तेव्हा भारताचे नागरिक होण्याची माझी ही इच्छा पूर्ण करायचे असे मी ठरविले होते. पण पाँडिचेरी आश्रमातील माझ्या कार्यभारामुळे त्यापेक्षाही अधिक काळ मला थांबावे लागले. आता ती घटिका आल्यामुळे मी हे जाहीर करू शकते.

श्रीअरविंदांच्या आदर्शानुसार, सत्य हे एकत्वामध्ये आहे, विभाजनात नाही हे दाखविणे हा माझा हेतू आहे. एका देशाचे नागरिकत्व मिळविण्यासाठी दुसऱ्या देशाचा त्याग करणे हा काही खरा उपाय असू शकत नाही. म्हणून मला अशी आशा आहे की, मला दुहेरी नागरिकत्व देण्यात येईल, म्हणजे भारताचे नागरिकत्व स्वीकारत असताना, माझे फ्रेंच नागरिकत्व देखील अबाधित राहू शकेल. मी जन्माने फ्रेंच आहे आणि माझे प्रारंभिक शिक्षण फ्रान्समध्ये झाले आहे, पण माझ्या आवडीनिवडी भारतीय आहेत आणि भारताचे नागरिक होणे हा माझा निर्णय आहे.

माझ्या चेतनेमध्ये या दोन्ही देशांत काही विरोधाभास नाही, तर उलट, त्या दोन्हीचा सुमेळ आहे, ते एकमेकांना पूरक आहेत. मला माहीत आहे की मी दोन्ही देशांची सारखीच सेवा करू शकेन कारण श्रीअरविंदांच्या शिकवणुकीला मूर्त रूप देणे हे माझ्या जीवनाचे एकमेव ध्येय आहे आणि त्यांची शिकवण अशी आहे की, सर्व राष्ट्रं ही मूलतः एक आहेत आणि या राष्ट्रांनी सुव्यवस्थित, सुमेळात्मक विविधतेतून पृथ्वीवर ईश्वरीय एकत्वाची अभिव्यक्ती करावी, हे अभिप्रेत आहे.

– श्रीमाताजी (CWM 13 : 43)

(तत्कालीन कायद्यानुसार असे दुहेरी नागरिकत्व स्वीकारता येत नव्हते आणि म्हणून, श्रीमाताजींनी १५ ऑगस्ट १९५४ या दिवशी भारतीय नागरिकत्व स्वीकारले.)

Latest posts by श्रीमाताजी (see all)
श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

सत्याचा मानदंड

  दि. २५ एप्रिल १९५४ श्रीअरविंदांचे आपल्या मातृभूमीवर नेहमीच अगाध प्रेम होते. भारतभूमी महान, उदात्त,…

1 day ago

सत्याचे आगमन

फेब्रुवारी १९५४ भारताचे आणि जगाचे संरक्षण करण्यासाठी सामंजस्यपूर्ण इच्छाशक्ती आणि आध्यात्मिक ज्ञान यांच्या आधारे घडण…

2 days ago

देशसेवा

  ऑक्टोबर १९४८ प्रामाणिक, धैर्यवान, सहिष्णू आणि सत्त्वनिष्ठ राहून तुम्ही तुमच्या देशाची सर्वोत्तम सेवा करू…

3 days ago

भारताची अग्निपरीक्षा

  दि.०३.०६.१९४७ (भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड लुईस माऊंटबेटन यांनी ०२ जून १९४७ रोजी रेडिओवरून एक भाषण…

4 days ago

एक महान निर्णायक वळण

  (सन १९१८) सध्याचा काळ असा आहे की जेव्हा, अखिल जगाप्रमाणेच भारतासाठीसुद्धा, त्याची भावी नियती…

1 week ago

आपल्या मोक्षाची पूर्वअट

  (सन १९१०) खरी अडचण ही आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये नसते; तर ती नेहमी आपल्यामध्येच असते. व्यक्तीला…

1 week ago