(दि. १९.०६.१९०९)
युरोपियन समाजाची हुबेहूब नक्कल करून, यंत्रणेत बदल घडवून आणून, आमच्या समाजाचे पुनरुज्जीवन होईल यावर आमचा विश्वास नाही. विधवाविवाह, जातीयतेच्या जागी वर्गव्यवस्था, प्रौढविवाह, आंतरजातीय विवाह, सहभोजन आणि अशाच तऱ्हेचे समाजसुधारकांचे इतर काही रामबाण उपाय हे फक्त यांत्रिक बदल आहेत. त्यांचे गुणावगुण काहीही असोत पण या गोष्टी राष्ट्राच्या आत्म्याला जिवंत ठेवू शकत नाहीत; किंवा अधोगती व ऱ्हास यांचा ओघ त्या रोखू शकत नाहीत. त्यास फक्त चैतन्यशक्तीच सुरक्षित ठेवू शकते आणि हृदय विशाल व स्वतंत्र झाले तरच आम्ही सामाजिक व राजकीयदृष्ट्या महान व स्वतंत्र होऊ शकतो. पाश्चात्य देशांमधून आयात केलेल्या धर्माच्या संकुचित व निम्नतर संकल्पनांवर आधारित अशा नव्या धर्मपंथांची संख्या वाढविणे किंवा हिंदुधर्माचा केवळ पोषाख व देह चिरस्थायी राहावा म्हणून एखादी संघटना स्थापन करणे अशा गोष्टींमुळे आमचे आध्यात्मिक आरोग्य, आणि आमची ऊर्जा व महानता आम्हाला पुनर्प्राप्त होईल, असे आम्ही मानत नाही.
भौतिकतावाद आणि मुक्त विचार यांच्या अटळ अशा संधिकालातून, धार्मिक विचार व अनुभूती यांच्या एका नव्या समन्वयाकडे, हे जग जात आहे. या नव्या धार्मिक जगताचे जीवन हे असहिष्णुतेपासून मुक्त असून, श्रद्धा व उत्साह यांनी परिपूर्ण, धर्माच्या सर्व संप्रदायांचा, पंथांचा स्वीकार करणारे असेल; कारण या जगाची त्या एकमेवाद्वितीय ईश्वरावर अढळ श्रद्धा आहे. जो धर्म श्रद्धा आणि विज्ञान यांना, तसेच ईश्वरवाद (Theism), ख्रिश्चनधर्म, इस्लाम व बौद्धधर्म या सर्वांना कवेत घेतो आणि तरीसुद्धा, तो यांपैकी काहीही नाही; अशा धर्माकडे विश्वचैतन्य वळत आहे. (क्रमश:)
– श्रीअरविंद (CWSA 08 : 25-26)
(दि. १९.०६.१९०९) आम्ही जे कार्य आमच्या डोळ्यांसमोर ठेवले आहे ते केवळ यांत्रिक नसून, नैतिक…
(दि. १९.०६.१९०९) जगाच्या डोळ्यांसमोर अगदी वेगाने, अगदी स्पष्टपणे, भारतामध्ये राष्ट्रउभारणीचे कार्य घडू लागले आहे…
दि. १९.०६.१९०९ प्रत्येक व्यक्तीला, विशेषत: भारताचे, जगाचे, ईश्वराचे कार्य करण्यास पुढे सरसावणाऱ्या तरुण पिढीला…
(श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांनी भारताविषयी आणि त्याच्या जीवितकार्याविषयी वेळोवेळी जे उद्गार काढले होते ते आता…
(श्रीमाताजींनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारतमातेला केलेले अभिवादन...) हे आमच्या माते, हे भारताच्या आत्मदेवते,…
(भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशीच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि. १४ ऑगस्ट १९४७ रोजी, श्रीअरविंदांनी दिलेला…