(दि. १९.०६.१९०९)
आम्ही जे कार्य आमच्या डोळ्यांसमोर ठेवले आहे ते केवळ यांत्रिक नसून, नैतिक आणि आध्यात्मिक आहे. केवळ शासनाच्या प्रकारामध्ये बदल घडविणे हेच आमचे उद्दिष्ट नसून राष्ट्रबांधणी हे आमचे उद्दिष्ट आहे. राजकारण हा या कामाचा एक भाग आहे, पण केवळ अंशभागच! आम्ही केवळ राजकारण, सामाजिक प्रश्न, केवळ धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान, साहित्य वा केवळ विज्ञान यांना वाहून घेणार नाही तर; या सर्वांचा समावेश आम्ही – जो आमच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाचा धर्म आहे, राष्ट्रधर्म आहे, जो आमच्या दृष्टीने वैश्विक देखील आहे – त्या तत्त्वामध्ये करतो.
जीवनाचा एक शक्तिशाली कायदा आहे, मानवी उत्क्रांतीचे एक महान तत्त्व आहे, आध्यात्मिक ज्ञान व अनुभूतीचे असे एक संचित आहे की ज्या संचिताचे संरक्षण करणे, ज्याचे जितेजागते उदाहरण बनणे आणि ज्याचा प्रचार करणे हे भारताचे आजवरचे नियत कार्य राहिले आहे. हा आहे शाश्वत धर्म, सनातन धर्म. परकीय प्रभावांच्या दडपणामुळे भारताने धर्माची केवळ चौकटच मोठ्या प्रमाणात गमावली आहे असे नाही तर, भारताने धर्माचे जिवंत सत्यत्वच गमावले आहे. कारण भारताचा हा धर्म आचरणात आणला गेला नाही, तर त्याला काहीअर्थच असणार नाही. तो जीवनाच्या कोणत्या तरी एका भागात उपयोगात आणणे पुरेसे नसून, तो जीवनाच्या सर्वांगांत उपयोगात आणला पाहिजे. त्याचे चैतन्य आमच्यामध्ये, आमच्या समाजामध्ये, आमच्या राजकारणामध्ये, आमच्या साहित्यामध्ये, आमच्या विज्ञानामध्ये, आमच्या व्यक्तिभूत चारित्र्यामध्ये, आमच्या आत्मीयतांमध्ये, आमच्या आशाआकांक्षामध्ये प्रविष्ट झाले पाहिजे. या धर्माचे मर्म जाणून घेणे, त्याची सत्य म्हणून अनुभूती घेणे, तो ज्या उच्च भावनांप्रत उन्नत होत आहे त्या भावना अनुभवणे, आणि त्या जीवनामध्ये अभिव्यक्त करणे आणि प्रत्यक्षात उतरविणे म्हणजे आमच्या दृष्टीने कर्मयोग होय.
आम्ही असे मानतो की, योगसाधनेला मानवी जीवनाचे ध्येय बनविण्यासाठी भारताची उन्नती होत आहे. योगामुळेच भारताला स्वातंत्र्य, एकता आणि महानता प्राप्त करून घेण्यासाठी बळ मिळणार आहे, आणि ते सारे टिकवून ठेवण्यासाठीचे बळदेखील भारताला या योगामुळेच मिळणार आहे. आमच्या नजरेला आध्यात्मिक क्रांती दिसत आहे आणि भौतिक हे केवळ त्याची छाया आणि त्याचे प्रतिबिंब आहे. (क्रमश:)
– श्रीअरविंद (CWSA 08 : 24)
(दि. १९.०६.१९०९) जगाच्या डोळ्यांसमोर अगदी वेगाने, अगदी स्पष्टपणे, भारतामध्ये राष्ट्रउभारणीचे कार्य घडू लागले आहे…
दि. १९.०६.१९०९ प्रत्येक व्यक्तीला, विशेषत: भारताचे, जगाचे, ईश्वराचे कार्य करण्यास पुढे सरसावणाऱ्या तरुण पिढीला…
(श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांनी भारताविषयी आणि त्याच्या जीवितकार्याविषयी वेळोवेळी जे उद्गार काढले होते ते आता…
(श्रीमाताजींनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारतमातेला केलेले अभिवादन...) हे आमच्या माते, हे भारताच्या आत्मदेवते,…
(भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशीच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि. १४ ऑगस्ट १९४७ रोजी, श्रीअरविंदांनी दिलेला…
(भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशीच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि. १४ ऑगस्ट १९४७ रोजी, श्रीअरविंदांनी दिलेला…