अशक्यतेची जाणीव
मी आज जे करू शकत नाहीये तो, मी भविष्यात जे करणार आहे त्याचा संकेत आहे. अशक्यतेची जाणीव होणे ही सर्व शक्यतांची सुरुवात असते. हे कालबद्ध विश्व म्हणजे एक विरोधाभास होता आणि एक अशक्यता होती; म्हणूनच त्या शाश्वताने स्वतःच्या अस्तित्वामधून हे विश्व निर्माण केले.
*
अशक्यता म्हणजे आजवर प्रत्यक्षात न उतरलेल्या महत्तर शक्यतांची केवळ गोळाबेरीज आहे. प्रगतीचा पुढचा टप्पा आणि अद्यापि पूर्णत्वास न गेलेला प्रवास या गोष्टी अशक्यतेमुळे झाकल्या गेलेल्या असतात.
*
मानवतेने प्रगत व्हावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर सर्व पूर्वकल्पना बाजूला करा. तसे केल्याने, आजवर दुर्लक्षित राहिलेला विचार जागृत होतो आणि तो सर्जनशील बनतो. अन्यथा तो त्याच त्याच यांत्रिक चक्रात पुनरावृत्त होत राहतो आणि तीच त्याची योग्य कृती आहे असे समजण्याची चूक करतो.
– श्रीअरविंद (CWSA 13 : 200)
Latest posts by श्रीअरविंद (see all)
- अशक्यतेची जाणीव - July 23, 2026
- ईश्वराचे अपयश? - July 18, 2026
- मानवी अस्तित्वाचा संपूर्ण अर्थ - July 16, 2026






