सृष्टीचे ध्येय
प्रत्येक जीव हा त्या विधात्याप्रमाणे (Creator) सचेत झाला पाहिजे, हे या सृष्टीचे ध्येय आहे, असे आपण म्हणू शकतो. अनंततेची चेतना, शाश्वततेची चेतना – जी सर्वशक्तिमान असते, ती ‘चेतना’ (Consciousness) हेच या सृष्टीचे ध्येय आहे. तिला आपण ‘ईश्वर’ असे संबोधतो. प्रत्येक कणाकणामध्ये ही ‘चेतना’ आहे, प्रत्येक अंशमात्रामध्ये हीच ‘चेतना’ सामावलेली आहे.
हे जग विभक्ततेतून निर्माण झाले आहे आणि या विभक्ततेमध्येच ते ‘शाश्वत’ स्वतःला आविष्कृत करत असते.
– श्रीमाताजी (CWM 11 : 289)
Latest posts by श्रीमाताजी (see all)
- आविष्करण आणि अभिव्यक्ती - July 13, 2026
- विश्वाचे गंतव्यस्थान? - July 12, 2026
- अतिमानसाचे कार्य - July 11, 2026






