सृष्टीनिर्मितीचे प्रयोजन
ही जी सृष्टी आहे ती काही ईश्वराला परक्या असणाऱ्या एखाद्या गोष्टीपासून निर्माण केली गेली नाहीये. तर त्या ईश्वराने स्वतःमधूनच या सृष्टीची निर्मिती केली आहे. जणू काही तो स्वतःच स्वतःकडे पाहत असावा अशा पद्धतीने म्हणजे, तो स्वतः काय आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी त्याने स्वतःला वस्तुरूपात आणले आहे. एकाग्रतेच्या आंतरिक अक्रिय अवस्थेमध्ये राहण्याऐवजी, म्हणजे जेथे सारेच अप्रकट असते अशा अवस्थेमध्ये राहण्याऐवजी, त्याने ‘स्वतःला पाहण्यासाठी’ स्वतःलाच स्वतःबाहेर प्रक्षेपित केले आहे. जणू काही स्वतःच्या अंतरंगामध्ये काय काय दडलेले आहे ते तो पाहू इच्छित असावा. म्हणजे स्वतःच्या अंतरंगामध्ये दडलेल्या संभाव्यतांची अनंतता पाहण्याची त्याला इच्छा असावी (आणि म्हणून त्याने ही सृष्टी निर्माण केली आहे.)
– श्रीमाताजी (CWM 05 : 373-374)
Latest posts by श्रीमाताजी (see all)
- जीवनाचे खरे उद्दिष्ट - July 22, 2026
- आत्मसाक्षात्काराकडून अधिक उच्चतर ध्येयाकडे… - July 21, 2026
- आत्मसाक्षात्कार ही इतिकर्तव्यता? - July 20, 2026





