प्रामाणिकपणा आणि आध्यात्मिक अनुभव
व्यक्तीला आलेल्या सर्व आध्यात्मिक अनुभवांचे मोल हे फक्त तिच्या प्रामाणिकपणाच्या प्रमाणावरच अवलंबून असते. काही जण प्रामाणिक नसतात. ते (मनाने) अद्भुत अनुभव रचतात आणि त्यांना तसे अनुभव खरोखरच आले आहेत, अशी कल्पना ते करू लागतात. परंतु जी माणसं प्रामाणिक असतात, ज्यांना खरेखुरे अनुभव आलेले असतात (त्यांच्या बाबतीत काय परिस्थिती असते?) तर जेव्हा त्यांना ईश्वरी अस्तित्वाची प्रत्यक्षानुभूती येते, तेव्हा ‘तो अनुभव खरा नाही,’ असे सर्व जगाने जरी त्यांना सांगितले तरी, त्यामुळे ते यत्किंचितही विचलित होत नाहीत.
– श्रीमाताजी (CWM 04 : 135)
Latest posts by श्रीमाताजी (see all)
- सकारात्मक वृत्तीचा परिणाम - June 12, 2026
- स्वप्नांवर विश्वास ठेवा - June 11, 2026
- उपयुक्ततावादाचा आजार - June 10, 2026






