“बालकाने नेहमी काय लक्षात ठेवले पाहिजे? त्याने निरपवाद प्रामाणिकपणाची आवश्यकता मनावर ठसवली पाहिजे. सत्याच्या अंतिम विजयाबद्दल खात्री बाळगली पाहिजे. त्याने ध्येय संपादन करण्याची इच्छा बाळगली पाहिजे आणि सातत्यपूर्ण प्रगतीची शक्यता आहे, हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे.”
मी निरपवाद प्रामाणिकपणावर एवढा भर का देत असते? ते तुम्हाला सांगते. तुम्ही आता मोठे झाला आहात. पण तुम्ही लहान होतात त्या वेळी तुम्हाला काय शिकवण्यात आले होते ते कदाचित तुम्हाला आठवत असेल. बहुधा सर्वच पालक त्यांच्या मुलांना सांगत असतात की, ”तुम्ही खोटे बोलता कामा नये, खोटे बोलणे अतिशय वाईट असते.” परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की, ते स्वतःच बरेचदा तुमच्यासमोर खोटं बोलत असतात. आणि मग जी गोष्ट ते स्वतःच करत नाहीयेत, ती गोष्ट ते तुम्हाला का करायला सांगत आहेत? असा प्रश्न तुम्हाला पडतो. आणि असे असूनसुद्धा, प्रामाणिक असणे हे अत्यंत आवश्यक आहे, हे अगदी लहान वयातच मुलांना सांगितले गेले पाहिजे.
दुसऱ्यांपेक्षा चलाख (smart) कसे व्हावे किंवा दुसऱ्यांच्या नजरेत आपण चांगले दिसावे यासाठी लपवाछपवी कशी करावी, हे बरेचदा मुलांना शिकविले जाते. काही पालक भीती दाखवून मुलांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करतात; पण शिक्षणाच्या सर्व पद्धतींपैकी ही सर्वांत वाईट पद्धत आहे; कारण त्यामुळे खोटे बोलणे, फसविणे, ढोंग करणे आणि तत्सम अन्य गोष्टींना प्रोत्साहन दिले जाते. पण पालकांनी जर मुलांना वारंवार असे समजावून सांगितले की, “तुम्ही जर पूर्ण प्रामाणिक नसाल, म्हणजे केवळ दुसऱ्याशीच असे नव्हे, तर स्वत:शीसुद्धा पूर्णपणे प्रामाणिक राहिला नाहीत आणि स्वत:तील अपूर्णता व कमतरता झाकण्याचा प्रयत्न केलात, तर तुम्ही कधीच कोणतीही प्रगती करू शकणार नाही; कोणतीही प्रगती कधीच न करता, तुम्ही जसे आज आहात तसेच कायम राहाल. तेव्हा तुम्हाला अगदी नुसत्या प्राथमिक अजाण अवस्थेतून जरी बाहेर पडायचे असेल आणि विकसित होत जाणाऱ्या चेतनेत उन्नत व्हायचे असेल, तर त्यासाठीसुद्धा सर्वात महत्त्वाची, एकमेव महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे प्रामाणिकपणा.
करू नये अशी एखादी गोष्ट जर तुम्ही केली असेल, तर ती गोष्ट तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाशी कबूल केली पाहिजे. तुमच्यामध्ये एखादी अयोग्य अशी ऊर्मी उठली असेल, तर तिच्या नजरेला नजर भिडवून तुम्ही स्वत:ला सांगितले पाहिजे की, ‘ते चांगले नाही’ किंवा ‘ते घृणास्पद आहे’, एवढेच नव्हे तर, ‘ते दुष्टपणाचे आहे.” (क्रमशः)
• श्रीमाताजी (CWM 15 : 297-298)
साधक : आत्मवंचनेला (स्वतःची फसवणूक करणे, Self-deception) हजार तोंडं असतात आणि आमच्यामध्ये दडून बसण्याचे तिचे…
व्यक्तीच्या अंतरंगामध्ये जोपर्यंत आंतरिक संघर्षाची शक्यता असते तोपर्यंत तिच्यामध्ये अजूनही काही अंशी अप्रामाणिकपणा शिल्लक…
ईश्वरी साहाय्य मिळण्यासाठी प्रामाणिकपणाचा एक कणदेखील पुरेसा असतो. व्यक्तीला एखाद्या समस्येवर खरोखरच उत्तर हवे असेल…
प्रामाणिकपणा हा जगामधील इतका दुर्मिळ गुण आहे की, जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये तो गुण आढळून येतो…
साधक : प्राण रूपांतरणाची आस बाळगत असतो पण तो नेहमीच बाहेरून येणाऱ्या आवेगांना, गोष्टींना बळी…
साधक : माताजी, पारदर्शक प्रामाणिकपणा म्हणजे काय ? श्रीमाताजी : प्रामाणिकपणाची तुलना वातावरणाशी किंवा…