आध्यात्मिक उत्क्रांती ही एकाच वेळी विभिन्न मार्गांनी वाटचाल करणारी एक विशाल आणि जटिल प्रक्रिया असते. पूर्णयोगाच्या साधकाकडे जे गुण अत्यावश्यक असतात त्यापैकी एक गुण म्हणजे प्रामाणिकपणा (sincerity).
आपण व्यवहारात वावरत असताना ज्याला प्रामाणिकपणा म्हणतो तो प्रामाणिकपणा आणि श्रीअरविंद व श्रीमाताजी ज्याचे प्रतिपादन करतात, तो प्रामाणिकपणा; या दोन्हीमध्ये काही साम्य-भेद आहेत का, हे लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते.
साधनेच्या संदर्भात तर या प्रामाणिकपणाचे मोल अधिकच उजळलेले दिसते. कारण आपण आपली साधना किती प्रामाणिकपणाने करत आहोत यावर साधनेची यशस्विता अवलंबून असते. तेव्हा श्रीअरविंद व श्रीमाताजी यांना अभिप्रेत असणारा प्रामाणिकपणा म्हणजे नेमके काय, तो अंगी कसा बाणवता येतो, यासंबंधीचा विचार येथे केला आहे. प्रामाणिकपणाचे साधनेतील स्थान किती महत्त्वाचे आहे, तसेच अप्रामाणिकपणाचे निर्मूलन कसे करावे या मुद्द्यांचाही विचार आपण करणार आहोत.
उद्यापासून सुरू होणाऱ्या ‘प्रामाणिकपणा’ या मालिकेचे आपण नेहमीप्रमाणेच स्वागत कराल अशी आशा आहे.
– संपादक,
अभीप्सा मराठी मासिक
(तुम्ही जर प्रामाणिक नसाल तर तुमची प्रगती कधीच होऊ शकणार नाही, या नियमाबद्दल श्रीमाताजींनी काही…
"बालकाने नेहमी काय लक्षात ठेवले पाहिजे? त्याने निरपवाद प्रामाणिकपणाची आवश्यकता मनावर ठसवली पाहिजे. सत्याच्या अंतिम…
साधक : आत्मवंचनेला (स्वतःची फसवणूक करणे, Self-deception) हजार तोंडं असतात आणि आमच्यामध्ये दडून बसण्याचे तिचे…
व्यक्तीच्या अंतरंगामध्ये जोपर्यंत आंतरिक संघर्षाची शक्यता असते तोपर्यंत तिच्यामध्ये अजूनही काही अंशी अप्रामाणिकपणा शिल्लक…
ईश्वरी साहाय्य मिळण्यासाठी प्रामाणिकपणाचा एक कणदेखील पुरेसा असतो. व्यक्तीला एखाद्या समस्येवर खरोखरच उत्तर हवे असेल…
प्रामाणिकपणा हा जगामधील इतका दुर्मिळ गुण आहे की, जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये तो गुण आढळून येतो…