अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – २१
(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)
तुम्हाला तुमच्या प्राणाचे शुद्धीकरण करायचे असेल तर, खोटेपणाबरोबर, मिथ्यत्वाबरोबर तुमचा प्राण जी तडजोड करत आहे ती काढून टाकली पाहिजे. आणि त्याच्यावर साधे सरळ आंतरात्मिक सत्य कोरून ठेवण्याची सवय तुम्ही लावून घेतली पाहिजे. म्हणजे मग त्या प्राणामध्ये शिरकाव करण्यास कोणालाच वाव मिळणार नाही. तुमच्या प्राणामधील जो भाग अशा प्रकारच्या तडजोडी करत आहे त्या भागावर हा धडा पक्का कोरून ठेवता आला तर, (तुमच्या हातून घडलेल्या) या चुकीच्या गोष्टीमधूनही निश्चितपणे काहीतरी चांगले निष्पन्न होईल.
तुमच्या प्राणिक अस्तित्वाच्या दरवाजावर श्रीमाताजींची पुढील सूचना चिकटवून ठेवा — “येथून पुढे, या दरवाजाच्या आतमध्ये खोटेपणाला, मिथ्यत्वाला प्रवेश नाही.” आणि ती सूचना काटेकोरपणे अंमलात आणली जात आहे ना, हे पाहण्यासाठी दरवाजावर एका पहारेकऱ्याची नेमणूक करा.
– श्रीअरविंद (CWSA 31 : 104-105)
- राष्ट्र म्हणजे काय? - October 13, 2026
- भारताचे आध्यात्मिक योगदान - October 11, 2026
- भारताची एकात्मता का आवश्यक? - October 10, 2026





