साधना, योग आणि रूपांतरण – २६३
प्राणाचे रूपांतरण
बाह्यवर्ती प्राणाच्या शुद्धीकरणासाठी बाह्य शिस्तीची आवश्यकता असते, हे खरे आहे. अन्यथा तो अस्वस्थ आणि लहरी, कल्पनाविलासात रमणारा असा राहतो आणि तो त्याच्या स्वतःच्या भावावेगांचा गुलाम बनून राहतो. आणि त्यामुळे, अविचल आणि स्थायी अशी उच्चतर चेतना तेथे दृढपणे टिकून राहावी यासाठी तेथे कोणताही पाया बांधता येत नाही.
*
नियंत्रणामध्ये राहून किंवा योग्यायोग्यतेचे जे मापदंड आहेत त्यानुसार कृती करणे आणि जीवन जगणे म्हणजे, प्राणाला किंवा शरीराला त्यांना वाटेल तसे वागण्यास मुभा न देणे आणि सत्यविरहित किंवा व्यवस्थाविरहित स्वैरकल्पनांनुसार मनाला सैरावैरा भटकण्यास संमती न देणे, हा शिस्तीचा, अनुशासनाचा अर्थ आहे. ज्यांचे आज्ञापालन करणे आवश्यक आहे त्यांचे आज्ञापालन करणे याचाही समावेश शिस्तीमध्ये होतो.
*
योग्य रीतीने उपयोग केला तर प्राण चांगला असतो. तो कृती करण्यासाठी आवश्यक असणारे साधन असतो. परंतु सर्वसाधारणपणे तो त्याच्या कनिष्ठ कृतीमध्ये अहंकार आणि इच्छावासना यांचे साधन बनतो आणि म्हणूनच त्याच्यामध्ये लिप्त होता कामा नये, तर उलट त्याला कठोर शिस्तीमध्ये ठेवले पाहिजे.
*
तुमच्या प्राणिक वृत्तीप्रवृत्ती आणि त्याच्या रचना यांच्याबाबत सावधगिरी बाळगा, (कारण) जेव्हा तुम्ही त्यांना मुभा देता तेव्हा तुम्ही एका घातक अशा उताराला लागलेले असता.
*
प्राणिक सवयी या अचानकपणे आणि निर्णायकपणे थांबविणे हा या सवयींबाबत सर्वात सोपा आणि सर्वोत्तम मार्ग असतो, हे निश्चित!
– श्रीअरविंद (CWSA 31 : 107, 107), (CWSA 31 : 108, 108, 108)
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…