साधना, योग आणि रूपांतरण – २०९
साधना, योग आणि रूपांतरण – २०९
मनाला योग्य दृष्टी देऊन, प्राणिक आवेग व भावना यांना योग्य वळण लावून, आणि शारीरिक हालचालींना योग्य वळण लावून तसेच शरीराला योग्य सवयी लावून, कनिष्ठ प्रकृतीचे परिवर्तन घडविणे म्हणजे आंतरात्मिकीकरण (Psychisation). वरील सर्व गोष्टींना योग्य वळण लावणे म्हणजे त्या सर्व गोष्टी एका ‘ईश्ववरा’कडेच वळविणे, तसेच या सर्व गोष्टी प्रेम, भक्ती यांवर आधारित असणे; तसेच श्रद्धा, आत्मनिवेदन आणि समर्पण असणे आणि अंतिमतः श्रीमाताजींची जाणीव व दृष्टी सर्वांमध्ये, सर्वत्र तसेच हृदयामध्ये अनुभवास येणे, त्यांचीच ‘शक्ती’ आपल्या अस्तित्वामध्ये कार्यकारी आहे असे जाणवणे, या गोष्टींचाही समावेश आंतरात्मिकीकरणामध्ये होतो.
शांती, प्रकाश, ज्ञान, शक्ती आणि आनंद यांचे वरून अवतरण होणे, आत्म्याची व ‘ईश्व,रा’ची जाणीव होणे तसेच उच्चतर वैश्विवक चेतनेची जाणीव होणे आणि समग्र चेतना तिच्यामध्ये परिवर्तित होणे म्हणजे ‘आध्यात्मिक परिवर्तन’ (The spiritual change) होय.
– श्रीअरविंद (CWSA 30 : 380)
- जगाची नवनिर्मिती तरुणच करतील - June 22, 2026
- दुर्गुणांचे शुद्धीकरण - June 18, 2026
- नैतिक शिक्षणाची संधी - June 17, 2026







