साधना, योग आणि रूपांतरण – २०५
पूर्णयोगाच्या परिभाषेत चैत्य (psychic) याचा अर्थ प्रकृतीमधील आत्मतत्त्व, आत्म्याचा अंश असा होतो. मन, प्राण आणि शरीर यांच्या पाठीमागे स्थित असणारे ते शुद्ध चैत्य किंवा दिव्य केंद्र असते; (हा आत्मा म्हणजे अहं नव्हे.) परंतु आपल्याला त्याविषयी अगदी पुसटशीच जाणीव असते. हे चैत्य अस्तित्व म्हणजे ‘ईश्वरा’चा अंश असते. आणि हे अस्तित्व त्याच्या बाह्यवर्ती साधनांच्या (मन, प्राण आणि शरीर यांच्या) माध्यमातून जीवनाचे अनुभव घेत असताना, जन्मानुजन्म शाश्वत असते. जसजसा हा जीवनानुभव वृद्धिंगत होत जातो तसतसे ते अस्तित्व एक विकसनशील चैत्य व्यक्तिमत्त्व, चैत्य पुरुष म्हणून आविष्कृत होऊ लागते. ते नेहमी सत्य, शिव आणि सुंदर यांच्यावर भर देत असते आणि सरतेशेवटी ते अस्तित्व प्रकृतीस ‘ईश्वरा’भिमुख करण्याइतके पुरेसे प्रबळ, सक्षम आणि तयार होते. त्यानंतर मानसिक, प्राणिक आणि शारीरिक पडदे भेदून, तो (चैत्य पुरुष) संपूर्णतया अग्रस्थानी येऊ शकतो आणि उपजत प्रेरणांचे नियमन करून तो प्रकृतीचे ‘रूपांतरण’ घडवू शकतो. तेव्हा आता प्रकृती आत्म्यावर वर्चस्व गाजवत नाही तर आता पुरुष, आत्मा त्याची सत्ता प्रकृतीवर चालवू लागतो.
– श्रीअरविंद (CWSA 30 : 337)
- साधना, योग आणि रूपांतरण – २२६ - January 18, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २१९ - January 11, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २१८ - January 10, 2025