साधना, योग आणि रूपांतरण – १७४
पूर्वार्ध
योग म्हणजे ‘ईश्वरा’शी ऐक्य; हे ऐक्य एकतर पारलौकिक (विश्वातीत) असेल किंवा वैश्विक असेल (विश्वगत) किंवा व्यक्तिगत असेल, किंवा हे ऐक्य आपल्या ‘पूर्णयोगा’मध्ये असते त्याप्रमाणे तिन्हींशी एकत्रितपणे असेल.
योग म्हणजे अशा एका चेतनेमध्ये प्रविष्ट होणे की, ज्यामध्ये व्यक्ती क्षुद्र अहंकार, वैयक्तिक मन, वैयक्तिक प्राण आणि शरीर यांनी मर्यादित झालेली नसते, तर ती परम आत्म्याशी किंवा वैश्विक (विश्वगत) चेतनेशी ऐक्य पावलेली असते. अथवा मग त्या व्यक्तीला जेथे स्वतःच्या आत्म्याची जाणीव होते, स्वतःच्या आंतरिक अस्तित्वाची आणि आपल्या अस्तित्वाच्या वास्तव सत्याची जाणीव होते अशा कोणत्यातरी एखाद्या अगाध चेतनेशी ती ऐक्य पावलेली असते.
योगिक चेतनेमध्ये व्यक्तीला फक्त वस्तुमात्रांचीच जाणीव असते असे नाही, तर तिला शक्तींचीदेखील जाणीव असते. तिला केवळ शक्तींचीच जाणीव असते असे नाही तर तिला शक्तींच्या पाठीमागे असणाऱ्या सचेत अस्तित्वाचीदेखील (conscious being) जाणीव असते. व्यक्तीला या सगळ्याची जाणीव केवळ तिच्या स्वतःमध्येच असते असे नाही, तर तिला ती जाणीव विश्वामध्येदेखील असते. (उत्तरार्ध उद्या..)
– श्रीअरविंद (CWSA 30 : 422)
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…