ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

योग आणि मानवी नातेसंबंध – ०३

काही विशिष्ट अपवाद वगळता, आपल्या कुटुंबातील सदस्यांना किंवा जे आपल्याला रस्त्यामध्ये, आगगाडीमध्ये, जहाजामध्ये, बसमध्ये योगायोगाने भेटतात अशा व्यक्तींना आपण भौतिक मदत पुरविणे, हे सर्वांत चांगले साहाय्य असते. उदाहरणार्थ, आर्थिक मदत, आजारपणामध्ये किंवा संकटामध्ये असताना केलेली मदत इ.

आपल्यासारखीच कलाभिरुची किंवा अन्य रुची असल्यामुळे जे आपल्याकडे आकर्षित झालेले असतात, त्यांच्या ऐंद्रिय-ऊर्जांमध्ये सुधारणा घडवून, त्यांमध्ये समतोल घडवून आणि त्यांना योग्य दिशा देऊन, त्यांच्या संवेदनशीलतेस आपण साहाय्य केले पाहिजे.

प्रगतीबद्दल एकसमान आस असल्यामुळे जे आपल्या संपर्कात आणले गेले आहेत त्यांना आपल्या उदाहरणाद्वारे मार्गदर्शन करून आणि आपल्या प्रेमाने त्यांचा मार्ग सुकर करून, आपण त्यांना साहाय्य करू शकतो.

आणि अंततः मानसिक आत्मीयतेचा परिणाम म्हणून जे आपल्या निकट आलेले आहेत, त्यांच्यासाठी आपण आपल्या प्रज्ञाप्रकाशाला उजळण्याची मुभा दिली पाहिजे; त्यामुळे, शक्य झाले तर, आपण आपल्या निकट आलेल्यांचे विचारक्षेत्र व्यापक करू शकू आणि त्यांचे आदर्श उजळवू शकू.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 72)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

दुर्दैवी परिस्थिती वाट्याला आली तर…

(कंटाळा आला तर त्याचा प्रगतीसाठी कसा उपयोग करून घेतला पाहिजे हे आपण कालच्या भागात पाहिले.…

24 hours ago

कंटाळ्यावरील उपाय

  व्यक्ती तरुण असो किंवा वृद्ध असो, तिने जर प्रगती केली नाही तर तिला कंटाळा…

2 days ago

एक अक्षय्य ऊर्जास्रोत – भाग ०२

  (आपण कालच्या भागात अन्नाव्यतिरिक्त उपलब्ध असणाऱ्या एका ऊर्जास्रोताचा विचार केला. आज आता अविनाशी असणाऱ्या…

3 days ago

एक अनोखा ऊर्जास्रोत

  (पूर्वार्ध) जोपर्यंत माणसं आणि हे जग आत्ता जसं आहे तसंच राहील तोपर्यंत, ऊर्जा मिळविण्यासाठी…

4 days ago

तारुण्य आणि वार्धक्य

  तारुण्य हे, व्यक्ती किती वयाची आहे यावर अवलंबून नसते, तर ते प्रगती करण्याच्या आणि…

5 days ago

शाश्वत तारुण्याचा आश्रय

  श्रीअरविंद हे भूतकाळाशी किंवा इतिहासाशीदेखील संबंधित नाहीत. श्रीअरविंद म्हणजे प्रत्यक्षात येणारा भविष्यकाळ आहेत. तुम्हाला…

6 days ago