जग ही जिवाची आत्मवंचना (self-delusion) आहे किंवा जग ही सैतानाची निर्मिती आहे असे आम्ही मानत नाही; तर आमच्या दृष्टीने, जग हे ‘ईश्वराचे आविष्करण’ (manifestation) आहे. अद्यापि जरी ते अंशतःच आविष्कृत झालेले असले तरी ते प्रगमनशील आणि उत्क्रांतिमय आविष्करण आहे. आणि म्हणून जीवनाचा परित्याग करणे, संन्यास घेणे (renunciation) हे आमच्या दृष्टीने जीवनाचे ध्येय असू शकत नाही किंवा ज्यासाठी या जगाची निर्मिती झाली आहे, त्या जगालाच नकार देणे हे देखील जीवनाचे उद्दिष्ट असू शकत नाही.
– श्रीअरविंद (CWSA 23-24 : 328)





