Tag Archive for: चिरतारुण्य

चेतना विकसित करणे हे जीवनाचे मुख्य उद्दिष्ट आहे असा जर विचार केला तर, अनेक समस्यांवरील उत्तरे सापडतील. प्रगती हे आपल्या जीवनाचे उद्दिष्ट बनविणे हा वृद्ध न होण्याचा एक सर्वोत्तम मार्ग आहे.

*

प्रत्येक क्षणी पुनर्जीवित कसे व्हायचे हे जाणणे हे चिरतारुण्याचे रहस्य आहे.

*

निरूपयोगीपणाने खर्च केलेली वर्षंच तुम्हाला वृद्ध बनवितात. ज्या वर्षी तुम्ही कोणतीही प्रगती केलेली नसते, तुमच्या चेतनेची वृद्धी झालेली नसते किंवा पूर्णत्वाच्या दिशेने एखादे पाऊलही तुम्ही पुढे टाकलेले नसते ते वर्ष हे तुमच्या आयुष्यातील निरुपयोगीपणाने खर्च केलेले वर्ष असते. तुमच्यापेक्षा उच्चतर आणि विशालतर असणाऱ्या अशा एखाद्या गोष्टीच्या साक्षात्कारासाठी तुमचे जीवन समर्पित करा, म्हणजे मग तुम्हाला सरणाऱ्या वर्षांचा भार कधीही जाणवणार नाही.

– श्रीमाताजी (CWM 12 : 122-124)

(जीवनऋतू ही मालिका आज समाप्त होत आहे.)