शब्दातीत ईश्वरी ऐश्वर्य
(श्रीमाताजीकृत प्रार्थना…)
हे ईश्वरा, तुझ्या दिव्य कायद्याचे आणि तुझ्या वैभवाच्या भव्यतेचे वर्णन शब्दांत कसे व्यक्त करता येईल? तुझ्या चेतनेच्या परिपूर्णत्वाचे आणि तुझ्या प्रेमाच्या अनंत आनंदाचे वर्णन कोणत्या शब्दात करता येईल? तुझ्या शब्दातीत शांतीचे वर्णन आम्ही शब्दांत कसे काय करू शकणार? तुझ्या निश्चल-नीरवतेचे महिमान आणि तुझ्या सर्वशक्तिमान सत्याचे ऐश्वर्य अभिव्यक्त करू शकतील असे कोणते शब्द आहेत?
आविष्कृत झालेले हे समग्र विश्वसुद्धा तुझी किमया आणि तुझ्या वैभवाचे वर्णन करण्यासाठी अपुरे आहे आणि काळाच्या शाश्वततेमध्ये, तेच तुझे वैभव शाश्वतरित्या, अधिकात अधिक आणि उत्तमोत्तम रितीने अभिव्यक्त करावे असा प्रयत्न ते विश्व करत आहे.
– श्रीमाताजी (CWM 01 : 306)
Latest posts by श्रीमाताजी (see all)
- खरी आणि विशुद्ध निश्चल-नीरवता - August 15, 2026
- ईश्वरी अवतरणाचा दाब - August 12, 2026
- चालत्या गाड्याला खीळ… - August 11, 2026




