योगमार्गाचे अनुसरण करण्याचा निर्णय
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही केली पाहिजे आणि ती म्हणजे तो आवेग पुन्हा येऊ नये अशी इच्छा बाळगली पाहिजे. मात्र, तो आवेग नाहीसाच होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल, तर तो आवेग तसाच ठेवा, पण असे असेल तर मग योगसाधना करण्याचा प्रयत्नही करू नका.
योगमार्गाचे अनुसरण करायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही सर्व अडीअडचणींवर मात करण्याचा संकल्प केला पाहिजे. तसा संकल्प जर तुम्ही केला नसेल तर, योगमार्गाचा अवलंबच करू नका. योगमार्गाचे अनुसरण करण्याचा तुमचा निर्णय अगदी प्रामाणिक आणि समग्र असला पाहिजे.
• श्रीमाताजी (CWM 04 : 77)
Latest posts by श्रीमाताजी (see all)
- सत्याचे आगमन - October 30, 2026
- देशसेवा - October 29, 2026
- भारताची अग्निपरीक्षा - October 28, 2026





