जीवन जगण्याचे शास्त्र – ०७
जीवन जगण्याचे शास्त्र – ०७
साधक : कधीकधी मला असे वाटते की, मी माझ्या सर्व दैनंदिन गोष्टी (उदाहरणार्थ मैदानावर खेळणे, वाद्यवादन, अभ्यास इत्यादी) सोडून द्याव्यात आणि सर्व वेळ फक्त (तुम्ही नेमून दिलेल्या) कामावरच लक्ष केंद्रित करावे. पण माझ्या तर्कबुद्धीला हे पटत नाही. माझ्या मनात ही अशी कल्पना कोठून आणि का येते?
श्रीमाताजी : येथे तुमची तर्कबुद्धी जे सांगत आहे ते योग्य आहे. जटिल परिस्थितीला तोंड न देता, जगण्याची परिस्थितीच सोपी करण्याची एक तामसिक प्रवृत्ती बाह्य प्रकृतीमध्ये बरेचदा आढळून येते. परंतु तुम्हाला जर सर्वांगीण प्रगती करायची असेल तर, अशा प्रकारचे सुलभीकरण (simplification) करणे तितकेसे इष्ट नाही.
– श्रीमाताजी (CWM 16 : 301)
Latest posts by श्रीमाताजी (see all)
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १८ - January 30, 2026
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १७ - January 29, 2026
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १६ - January 28, 2026






