श्रीमाताजी आणि समीपता – ३८
श्रीमाताजी या अनंतरूपधारिणी आहेत हे खरे आहे, पण आंतरिक रूपातील श्रीमाताजी आणि दृश्य रूपातील श्रीमाताजी यांच्यामध्ये फार फरक करता कामा नये. कारण केवळ दृश्यरूपात दिसणाऱ्या श्रीमाताजीच तेवढ्या अस्तित्वात आहेत असे नाही तर, त्यांच्यामध्येच त्यांची इतर अनेक रूपं सामावलेली आहेत आणि त्यांच्यामध्येच आंतरिक अस्तित्व व बाह्य अस्तित्व यांच्यामधील सुसंवाद प्रस्थापित झालेला आहे.
परंतु दृश्य रूपातील श्रीमाताजींना खऱ्या अर्थाने जाणून घेण्यासाठी, व्यक्तीने केवळ त्यांच्या बाह्य रूपाकडे पाहता कामा नये तर, त्यांच्या अंतरंगामध्ये काय आहे हे जाणून घेतलेच पाहिजे. व्यक्ती जर त्यांना अंतरंगाद्वारे भेटेल आणि त्यांच्या चेतनेमध्ये वृद्धिंगत होईल तरच हे जाणणे शक्य होते. जे कोणी त्यांच्याशी फक्त बाह्यतः नाते ठेवू पाहतात त्यांना ते समजणे शक्य नाही.
– श्रीअरविंद (CWSA 32 : 483)
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ - December 7, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ - December 6, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ - December 5, 2025







