साधना, योग आणि रूपांतरण – १७०
सर्व प्रकारचे योगमार्ग ही मूलतः माध्यमे आहेत. ती आपल्याला आपल्या अज्ञानी व सीमित पृष्ठवर्ती चेतनेतून – तिने आत्ता आपल्यापासून झाकून ठेवलेल्या – आपल्या अधिक विशाल व सखोल ब्रह्मामध्ये आणि जगतामध्ये प्रविष्ट होण्यासाठी तसेच परम व समग्र ‘सत्’मध्ये प्रविष्ट होण्यासाठी उपयुक्त ठरतात.
प्रत्येक वस्तुच्या मुळाशी ‘ब्रह्म’ आहे, किंबहुना ते प्रत्येक वस्तुला व्यापून आहे. किंबहुना, आपण ज्या पद्धतीने या जगाकडे पाहतो त्यापेक्षा काहीशा निराळ्या पद्धतीने पाहिल्यास सर्वकाही ‘ब्रह्म’ आहे; आपल्या विचारांच्या, जीवनाच्या आणि कृतींच्या द्वारे आपण चाचपडत त्या ब्रह्माच्या दिशेने वाटचाल करत असतो; आपल्या धर्माच्या आणि तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून त्याचे आकलन करून घेण्याचा, त्याच्याप्रत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आणि अंतिमत: आपण थेटपणे एखाद्या आंशिक किंवा एखाद्या संपूर्ण आध्यात्मिक अनुभूतीला स्पर्श करतो.
हा आध्यात्मिक अनुभव, (त्या अनुभवाप्रत पोहोचण्याची) पद्धत, साक्षात्कार-प्राप्ती यांनाच आपण ‘योग’ असे संबोधतो.
– श्रीअरविंद (CWSA 12 : 361)
- साधना, योग आणि रूपांतरण – २२६ - January 18, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २१९ - January 11, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २१८ - January 10, 2025