नमस्कार वाचकहो,

‘साधना, योग आणि रूपांतरण’ या मालिकेअंतर्गत आपण आजपर्यंत ‘साधना’ या भागाचा विचार पूर्ण केला. साधनेच्या तीन प्रमुख पद्धती म्हणजे ध्यानमार्ग, कर्ममार्ग आणि भक्तिमार्ग. या तीनही पद्धतींचा आपण सांगोपांग विचार केला, त्यातील अनेक बारकावे जाणून घेतले.

उद्यापासून आपण श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या साहित्याच्या आधारे ‘योग’ यासंबंधी जाणून घेणार आहोत. योगासंबंधीची सर्वसाधारण मान्यता काय आहे, पूर्णयोग म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्ये कोणती, इतर योगांपेक्षा त्याचे असलेले वेगळेपण काय, पूर्णयोगाचे ध्येय कोणते इत्यादी गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. धन्यवाद!

संपादक, ‘अभीप्सा’ मराठी मासिक

अभीप्सा मराठी मासिक
Latest posts by अभीप्सा मराठी मासिक (see all)