भगवदगीतेमध्ये वर्णिलेला कर्मयोगाचा गाभा
कर्म आराधना – २०
‘भगवद्गीते’मध्ये कर्मयोगाचा गाभा म्हणून सांगितला आहे, तो गाभा तुम्ही ग्रहण करू शकलात तर – स्वतःला विसरा आणि तुमच्या काळज्या, दुःखं यांना एका महत्तर चेतनेप्रत असलेल्या अभीप्सेमध्ये विरून जाऊ द्या. एक महत्तर ‘शक्ती’ या विश्वामध्ये कार्यरत आहे याची जाणीव करून घ्या आणि या विश्वामध्ये जे कार्य करायचे आहे, त्या कार्यासाठी स्वतःला एक साधन बनवा. मग ते कार्य अगदी छोटेसे का असेना! पण काहीही असले तरी, तुम्ही ते संपूर्णतया स्वीकारले पाहिजे आणि तुम्ही तुमची समग्र इच्छा त्यामध्ये ओतली पाहिजे – विभाजित आणि विचलित अशा इच्छेनिशी तुम्हाला कोणत्याच गोष्टीमध्ये यश मिळण्याची आशा बाळगता येणार नाही, – ना जीवनामध्ये आणि ना ‘योगा’मध्ये!
– श्रीअरविंद
[CWSA 29 : 237-238]
Latest posts by श्रीअरविंद (see all)
- एक महान निर्णायक वळण - October 25, 2026
- आपल्या मोक्षाची पूर्वअट - October 24, 2026
- भारत-माता - October 23, 2026





