सद्भावनायुक्त दैनंदिन जीवन
सद्भावना – १४
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)
कोणतेही कर्म हे शांततेमध्ये केल्यास नेहमीच सर्वोत्कृष्ट दर्जाचे होते. काम करण्यासाठीच जर बोलणे आवश्यक असेल तर फक्त त्याचा अपवाद असावा. गप्पागोष्टी फावल्या वेळासाठी राखून ठेवाव्यात. अशावेळी मग काम करत असताना, तुम्ही शांत (गप्पगप्प) असता याबद्दल कोणीही आक्षेप घेता कामा नये.
दुसरे असे की, तुम्ही इतरांबाबत योग्य दृष्टिकोन बाळगला पाहिजे आणि इतर काय म्हणतात किंवा काय करतात यामुळे तुम्ही स्वतःला अस्वस्थ, त्रस्त किंवा नाराज होऊ देऊ नये – वेगळ्या शब्दांत सांगायचे तर ‘समता’ बाळगावी आणि योगसाधकाला साजेशी अशी वैश्विक सद्भावना बाळगावी. तुम्ही तसे केलेत आणि तरीही इतर लोक अस्वस्थ झाले किंवा नाराज झाले तर, तुम्ही ते मनावर घेता कामा नये; कारण (तेव्हा मग) त्यांच्या चुकीच्या प्रतिक्रियांसाठी तुम्ही जबाबदार असणार नाही.
– श्रीअरविंद
(CWSA 31 : 322-323)
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४५ - December 13, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४४ - December 12, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४३ - December 11, 2025






