Entries by श्रीमाताजी

सार्वत्रिक प्रगतीस हातभार

साधना, योग आणि रूपांतरण – २० (भाग ०४) माझ्या दृष्टीने, माझ्या अनुभवाच्या आधारे सांगायचे तर (आणि माझा अनुभव पुरेसा दीर्घ आहे, कारण गेली सुमारे तेहतीस वर्षे मी विविध लोकांच्या संपर्कात आहे; त्यांचे प्रश्न, त्यांची योगसाधना, त्यांचे आंतरिक प्रयत्न मला माहीत आहेत; मी येथेही आणि इतरत्र, जगभरामध्ये सर्वत्र ते प्रश्न हाताळले आहेत.) मला असे वाटते की, […]

ध्यान आणि प्रगती – ०३

साधना, योग आणि रूपांतरण – १९ (भाग ०३) ध्यान कसे करायचे असते हे ज्यांना माहीत असते अशी माणसं थोडी असतात. आणि आपण असे मानूया की, पुष्कळशी साधना आणि अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर तुम्ही ध्यानधारणेमध्ये ‘ईश्वराच्या अस्तित्वा’शी सजगपणे संबंध प्रस्थापित करण्यात यशस्वी झाला आहात. …आणि त्याचा तुमच्या चारित्र्यावर आणि तुमच्या जीवनावर अनिवार्यपणे प्रभाव पडला आहे, असेही आपण […]

ध्यान आणि प्रगती – ०२

साधना, योग आणि रूपांतरण – १८ (भाग ०२) ध्यान करणाऱ्या काही लोकांपैकी काही जण असे असतात की ज्यांना खरोखर ध्यान कसे करायचे हे माहीत असते आणि ते कोणत्या एखाद्या संकल्पनेवर नाही तर, शांतीमध्ये, आंतरिक ध्यानामध्ये मन एकाग्र करत असत आणि त्याद्वारे ‘ईश्वरा’शी सायुज्य पावण्याच्या स्थितीपर्यंतसुद्धा ते जाऊन पोहोचत असत, असे त्यांचे म्हणणे असायचे आणि हे […]

ध्यान आणि प्रगती – ०१

साधना, योग आणि रूपांतरण – १७ (भाग ०१) (श्रीअरविंद आश्रमामध्ये श्रीमाताजी साधकांसमवेत ध्यानाला बसत असत. त्यांचा हा उपक्रम अनेक वर्षे चालू होता. तेथे आणि इतरत्र जो अनुभव त्यांनी घेतलेला होता, त्या अनुभवाच्या आधारे श्रीमाताजी येथे काही निरीक्षणे नोंदवत आहेत. श्रीमाताजींची ही निरीक्षणे पाच भागांमध्ये देत आहोत.) साधक : “असे काही जण असतात की, जे ध्यानाला […]

ध्यान आणि आध्यात्मिक जीवन

साधना, योग आणि रूपांतरण – १६ साधक : ध्यानाला बसणे ही एक अत्यावश्यक साधना नाही का? आणि त्यातून ‘ईश्वरा’शी अधिक उत्कट आणि सघन ऐक्य प्राप्त होत नाही का? श्रीमाताजी : तसे होऊ शकते. परंतु आपण काही साधनेसाठी साधना करत नाही. तर, आपण जे काही करत असू त्यामध्ये, सदा सर्वकाळ, आपल्या प्रत्येक कृतीमध्ये, प्रत्येक हालचालीमध्ये ‘ईश्वरा’वर […]

ध्यान आणि प्रगती

साधना, योग आणि रूपांतरण – १५ प्रश्न : एखादी व्यक्ती जितके अधिक तास ध्यान करेल, तेवढ्या प्रमाणात तिची प्रगती अधिक होईल, हे खरे आहे ना? श्रीमाताजी : ध्यानामध्ये व्यतीत केलेले तास हा काही आध्यात्मिक प्रगतीचा पुरावा होऊ शकत नाही. परंतु ध्यान करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागत नसेल तर ती मात्र तुमच्या आध्यात्मिक प्रगतीची खूण असते. […]

ध्यान आणि एकाग्रता यामधील फरक

साधना, योग आणि रूपांतरण – १३ साधक : ध्यान (meditation) आणि एकाग्रता (concentration) यांमध्ये काय फरक आहे? श्रीमाताजी : ध्यान ही फक्त मानसिक कृती असते, त्यामध्ये फक्त मनोमय पुरुषाला स्वारस्य असते. ध्यान करताना तुम्ही एकाग्रही होऊ शकता पण ती एकाग्रता मानसिक असते; तुम्हाला त्यातून शांती लाभू शकते पण ती फक्त मानसिक शांती असते आणि त्यावेळी […]

तुम्ही योग्य मार्गावर आहात

साधना, योग आणि रूपांतरण – ०५ तुम्हाला जर खरोखरच या योगमार्गाचे (पूर्णयोगाचे) अनुसरण करायचे असेल आणि योगसाधना करायची असेल, तर ती तुम्ही कोणाकडून कौतुक किंवा मानसन्मान मिळावा यासाठी करता कामा नये; तर योगसाधना ही तुमच्या जिवाची अनिवार्य निकड असल्यामुळे केली पाहिजे, कारण त्याशिवाय अन्य कोणत्याच मार्गाने तुम्ही आनंदी होऊ शकणार नाही. लोकांनी तुमची प्रशंसा केली […]

निंदकाचे घर…

साधना, योग आणि रूपांतरण – ०४ सन्मार्गाचे अनुसरण करण्याची ज्यांना इच्छा असते त्यांच्यावर सर्व प्रकारच्या दुरिच्छांचे हल्ले होण्याची शक्यता असते; (कारण) त्यांना ते समजत नाही आणि एवढेच नाही तर, त्यांना जे समजत नाही त्याचा ते बहुधा तिरस्कारच करतात. लोक तुमच्याविषयी जे द्वेषपूर्ण उद्गार काढतात, तुम्हाला मूर्खात काढतात त्यामुळे तुम्ही जर चिंताग्रस्त झालात, दुःखी झालात किंवा […]

योगसाधनेचा अपरिहार्य असा आरंभबिंदू

साधना, योग आणि रूपांतरण – ०३ व्यक्तीने (साधनेसाठी) तिच्या दैनंदिन जीवनाच्या परिस्थितीतून बाहेर पडलेच पाहिजे असे काही बंधनकारक नाही; मात्र व्यक्तीने तिचा आंतरिक दृष्टिकोन पूर्णपणे बदलणे आवश्यक असते. व्यक्तीने तिच्या अंगवळणी पडलेल्या गोष्टी करायला हरकत नाहीत पण त्या करताना तिचा दृष्टिकोन मात्र निराळा असावा. योगसाधना करण्यासाठी जीवनातील सर्व गोष्टींचा परित्याग करून एकांतवासात निघून जाणे, एखाद्या […]