आंतरिक कर्म
संवादक : “ऑरोविलमधील रहिवासी तेथील जीवनात आणि त्याच्या विकसनात सहभागी होतील.” श्रीमाताजी : तेथील रहिवासी त्यांच्या त्यांच्या क्षमतांनुसार आणि त्यांच्याकडील साधनांनुसार, तेथील जीवनात आणि त्याच्या विकसनात सहभागी होतील. तो सहभाग यंत्रवत् नसावा तर जिवंत आणि खराखुरा असावयास हवा. तो प्रत्येकाच्या क्षमतेनुसार असेल : म्हणजे, ज्यांच्याकडे भौतिक साधने आहेत, उदा. ज्याच्याकडे कारखान्यात निर्माण होणारे उत्पादन असेल […]






