नि:स्वार्थीपणे कर्म करणे
जर तुम्हाला साधना करावयाची असेल तर, साहजिकच थोडा वेळ तरी तुम्ही निरपेक्ष, नि:स्वार्थी कामासाठी, म्हणजेच फक्त स्वत:साठीच नसलेल्या कामासाठी दिला पाहिजे. अभ्यास करणे तर चांगलेच; त्याची अत्यंत गरजदेखील आहे, एवढेच नव्हे तर ते अनिवार्यसुद्धा आहे. मगाशी मी सांगितले त्याप्रमाणे, तुम्ही लहानपणीच काही गोष्टी शिकल्या पाहिजेत; नाहीतर मोठेपणी त्या साधणे अधिकच कठीण होते. असे एक वय […]






