योगसाधना आणि असमतोल
अजूनही काही प्रकारचे असमतोल असतात. (आता मी जे योगसाधना करतात किंवा आध्यात्मिक जीवन म्हणजे काय आहे हे ज्यांना माहीत असते आणि त्यानुसार, त्या मार्गावर वाटचाल करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्याविषयी बोलत आहे.) तुमच्या अंतरंगातील एखाद्या भागाला, मग तो मानसिक असेल, प्राणिक असेल किंवा शारीरिक सुद्धा असू शकेल, त्याला नीटसे काहीतरी उमगलेले असते, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी अभीप्सा असते, […]







