Entries by श्रीमाताजी

वाळूचा एक कण

आणखीही एक गोष्ट असते. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार योगसाधना करत असता. तुम्हाला असे सांगण्यात आले असते की, “स्वतःला खुले करा, तुम्हाला शक्ती प्राप्त होईल.” तुम्हाला असे सांगण्यात आलेले असते की, ”श्रद्धा आणि सदिच्छा बाळगा, तुमचे संरक्षण केले जाईल.” आणि तुम्ही खरोखरच त्या चैतन्यामध्ये न्हाऊन निघता, त्या शक्तीमध्ये न्हाऊन निघता, त्या संरक्षणात न्हाऊन निघता आणि जेवढ्या प्रमाणात […]

सजगतेचा अभाव

कधीतरी असे सुद्धा होते, म्हणजे असे की, समग्र अस्तित्व प्रगती करत असते, चढत्या वाढत्या संतुलनासहित ते प्रगती करत असते आणि लक्षणीय प्रगती देखील करून घेते; तुम्हाला वाटू लागते की, तुम्ही खूपच अनुकूल स्थितीत आहात, सारे काही चांगले चालू आहे, तुम्हाला खात्री असते आणि तुम्ही तुमच्या मार्गावर समृद्धपणे वाटचाल करत आहात हे तुम्ही पाहत असता… आणि […]

योगसाधना आणि असमतोल

अजूनही काही प्रकारचे असमतोल असतात. (आता मी जे योगसाधना करतात किंवा आध्यात्मिक जीवन म्हणजे काय आहे हे ज्यांना माहीत असते आणि त्यानुसार, त्या मार्गावर वाटचाल करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्याविषयी बोलत आहे.) तुमच्या अंतरंगातील एखाद्या भागाला, मग तो मानसिक असेल, प्राणिक असेल किंवा शारीरिक सुद्धा असू शकेल, त्याला नीटसे काहीतरी उमगलेले असते, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी अभीप्सा असते, […]

आंतरिक संघर्ष

अजून काही आंतरिक संघर्षदेखील असतात. ती भांडणे असतात. तुमच्याच विविध भागांमध्ये परस्परांमध्ये आंतरिक संघर्ष असतो. समजा, एकाचवेळी तुमच्यातील एखाद्या भागाला विश्रांती आवश्यक असते आणि दुसऱ्या एखाद्या भागाला काम करावेसे वाटत असते अशावेळी, तुम्ही हे प्रकरण कसे हाताळणार? (आणि हे असे बरेचदा घडते) ते भांडायला सुरुवात करतात. एकाला जे हवे आहे ते तुम्ही केलेत, तर त्याला […]

कार्यामधील विसंवाद

व्यक्तीने जागरूक असणे आवश्यक आहे. तिला स्वतःच्या अवयवांच्या कार्याची जाण हवी, कोणता अवयव नीट काम करत नाहीये, त्याची जाणीव हवी म्हणजे मग त्याने तंदुरुस्त होण्यासाठी, काय करायला हवे ते तुम्ही त्याला ताबडतोब सांगू शकाल. म्हणजे लहान मुलांना जसे समजावून सांगतात तसे, त्यांना समजावून सांगायचे. म्हणजे ते जेव्हा अहितकारक गोष्टींमध्ये गुंतू लागतात (हाच तो क्षण असतो […]

असंतुलनाची आंतरिक कारणे :

मी म्हटल्याप्रमाणे कारणे असंख्य असतात, आंतरिक कारणे तर असतातच, म्हणजे जी तुमची व्यक्तिगत असतात अशी कारणे असतातच आणि बाकीची बाह्यवर्ती कारणेही असतात, जी तुमच्यामध्ये बाहेरून येतात. म्हणजे आता दोन मुख्य प्रकार पडले. आपण म्हणालो तसे, तुमच्यामध्ये मेंदू, फुफ्फुसे, हृदय, पोट, यकृत इ. इ. घटक असतात. जर प्रत्येक जण त्याचे त्याचे कर्तव्य आणि त्याचे कार्य सामान्य […]

शारीरिक असंतुलन

अगदी केवळ शरीराच्या दृष्टिकोनातून पाहावयाचे झाले तर, दोन प्रकारची असंतुलने आढळून येतात – कार्यात्मक असंतुलन (functional disequilibrium) आणि इंद्रियगत असंतुलन (organic disequilibrium). तुम्हाला या दोन्हीतील फरक माहीत आहे की नाही, ते मला माहीत नाही. परंतु तुम्हाला अवयव असतात आणि तुमच्या शरीराचे सगळे भाग देखील असतात उदा. नसा, स्नायू, हाडे आणि अशा इतर सगळ्या गोष्टी. इंद्रियगत […]

असंतुलन आणि आजारपण

सर्व आजार हे संतुलनातील बिघाड दर्शवितात. याला कोणताही अपवाद नाही, पण या संतुलनातील बिघाडांचे अनेक प्रकार असतात. मी आत्ता फक्त शरीराबद्दलच बोलत आहे, मी प्राणाच्या नाडीगत आजारांबद्दल किंवा मानसिक आजारांबाबत बोलत नाहीये. ते आपण नंतर पाहू. आत्ता आपण फक्त या गरीबबिचाऱ्या लहानशा शरीराबद्दल बोलत आहोत. आणि मी म्हटले त्याप्रमाणे, सर्व आजार, अगदी सर्व आजार, मग […]

अवतरण आणि आविष्करण यांतील फरक

शिष्य : एका विधानाची सध्या इथे चर्चा आहे. त्यात असे म्हटले आहे की, “नुकतेच ह्या विजयाच्या बरोबरीने जे काही घडले आहे, ते केवळ अवतरण नव्हते तर ते आविष्करण होते. आणि एखाद्या व्यक्तिगत घटनेपेक्षा त्याचे मोल अधिक आहे : कारण अतिमनाचा वैश्विक लीलेमध्ये उदय झालेला आहे.” श्रीमाताजी : हो, हो. खरंतर मीच हे सारे म्हटले होते. […]