Entries by श्रीमाताजी

ऑरोविलच्या निर्मितीचा परिणाम

जर सर्व देशांमध्ये ऑरोविलच्या निर्मितीविषयी स्वारस्य जागृत होऊ शकले तर, त्यांनी आजवर जी चूक केली आहे, त्याचे परिमार्जन करण्याची ताकद त्यांच्यामध्ये हळू हळू येऊ लागेल. आणि स्वाभाविकपणेच, जेव्हा मला हे दाखविण्यात आले तेव्हा माझ्या लक्षात आले. ऑरोविलच्या निर्मितीचा परिणाम अदृश्यामध्ये काय व कसा झाला आहे, हे मला उमगले. ही कृती भौतिकातील, बाह्यवर्ती अशी नव्हती. ती […]

संभाव्य अरिष्ट व त्यावरील गूढ उपाय

पृथ्वीवर आज जी खरोखर दुःखदायक आणि भयंकर परिस्थिती आली आहे त्या तिच्या परिस्थितीकडे, तसेच सर्व देश ज्या दयनीय स्थितीतून जात आहेत त्या त्यांच्या अवस्थेकडे मी काही कारणासाठी पाहत होते. तेव्हा सर्वांना कवेत घेईल असे एक दृश्य माझ्या अंत:दृष्टीला दिसले; विविध देश आजवर जसे वागले आहेत आणि अधिकाधिक प्रमाणात, ज्या चढत्यावाढत्या खोटेपणाने वागत आहेत ते सारे […]

एक विशाल स्वप्न

न संपणाऱ्या युद्धांचा दीर्घ इतिहास असतानासुद्धा मानवजातीने आजवर खोल अंतरंगात एका आनंदमय, शांतीपूर्ण आणि सुसंवादी अशा सामूहिक जीवनाची अभीप्सा जोपासलेली आहे. मानवाच्या धार्मिक आणि धर्मनिरपेक्ष विचारांमध्ये या अभीप्सेने वेगवेगळी रूपे धारण केली आहेत. पण आजवर आपण फक्त तिच्या जवळपास जाईल अशी तात्पुरती एकता संपादन करण्यात यशस्वी झालो आहोत, खरी एकता मिळविण्यात नाही. कदाचित खराखुरा पायाच […]

पहिला प्रयोग

एखाद्याकडे संपूर्ण पारदर्शी प्रामाणिकता हवी. प्रामाणिकपणाचा अभाव हेच आज आपणाला भेडसावत असणाऱ्या सर्व अडचणींचे मूळ आहे. सर्व माणसांमध्ये अप्रामाणिकपणा आहे. या पृथ्वीवर केवळ शंभर माणसं अशी असतील की, जी संपूर्णपणे प्रामाणिक आहेत. माणसाची मूळ प्रकृतीच त्याला अप्रामाणिक बनविते – ती खूप जटिल आहे, कारण तो सातत्याने स्वत:ला फसवत असतो, स्वत:पासून सत्य लपवत असतो, स्वत:साठी सबबी […]

ऑरोविलचे प्रतीक

केंद्रस्थानी असलेला बिंदू ऐक्याचे प्रतीक आहे, परमश्रेष्ठाचे प्रतीक आहे; आतील वर्तुळ हे निर्मितीचे, नगरीच्या संकल्पनेचे प्रतिनिधित्व करते; बाहेरील पाकळ्या त्या संकल्पनेच्या अभिव्यक्तीचे, मूर्तरूपाचे सामर्थ्य दर्शवितात. * शुभ संकल्प बाळगणाऱ्या सर्वांना ‘ऑरोविल’तर्फे शुभेच्छा ! ज्यांना प्रगतीची आस आहे आणि जे उच्चतर व अधिक सत्यमय जीवनाची अभीप्सा बाळगतात त्या सर्वांना ऑरोविल निमंत्रित करीत आहे. – श्री माताजी […]

एक महान स्वप्न

या भूतलावर असे एक स्थान असावे की, जेथे कोणतेच राष्ट्र मालकी हक्काचा दावा करणार नाही. जिथे प्रामाणिक अभीप्सा बाळगणारी, शुभसंकल्प असणारी सर्व माणसं, या विश्वाचे नागरिक म्हणून मुक्त मनाने जीवन जगू शकतील. ती केवळ एकाचीच, म्हणजेच त्या परम सत्याचीच आज्ञा पाळतील. शांती, सलोखा, सुमेळ यांनी युक्त असे हे स्थान असेल जेथे, माणसांमधील संघर्षभावनेच्या सर्व प्रेरणा […]

वैश्विक नगरी

ऑरोविल ही एक अशी वैश्विक नगरी बनू इच्छिते की, जेथे पंथातीत होऊन, सर्व राष्ट्रीयता व सर्व प्रकारच्या राजकारणाच्या अतीत होऊन, सर्व देशांमधील स्त्रीपुरुष, शांती व प्रगतशील सुसंवादाने जीवन व्यतीत करू शकतील. मानवी एकता प्रत्यक्षात उतरविणे हा ऑरोविलचा हेतू आहे. * पृथ्वीला अशा एका स्थानाची आवश्यकता आहे की, जिथे माणसे राष्ट्राराष्ट्रांमधील वैमनस्य, सामाजिक रूढी, स्व-विसंगत नैतिकता […]

पृथ्वीवरच प्रगती शक्य आहे.

शरीरातील चैत्य अस्तित्वाची उपस्थिती हे नेहमीच सुरचना आणि परिवर्तनाचे केंद्र असते. म्हणून, दोन शारीर जन्मांच्या मधल्या संक्रमणाच्या काळात प्रगती होत राहते, असे समजणे किंवा काही जण मानतात त्याप्रमाणे, त्या काळात ही प्रगती अधिक पूर्णत्वाने आणि अधिक त्वरेने होते, असे मानणे ही मोठी चूक आहे. सर्वसाधारणत: त्या काळात कोणतीही प्रगती होत नाही; कारण चैत्य पुरुषाने विश्रांत […]

चेतनेचा विकास

प्रश्न : समजा एखाद्या व्यक्तीने एखाद्या जन्मात बुद्धिमान बनावे म्हणून खूप मेहनत केली, पण जर तो पुढच्या जन्मात निर्बुद्ध म्हणून जन्माला आला, तर त्याच्या त्या मेहनतीचा, परिश्रमांचा काय उपयोग? श्रीमाताजी : अशा व्यक्तीचा चैत्य पुरुष हा निर्बुद्ध नसतो. उदाहरणार्थ असे समजा की, त्या व्यक्तीच्या चैत्य पुरुषाने लेखक असण्याचा आणि त्यामुळे त्याचे अनुभव पुस्तकं आणि भाषणं […]

गत जन्मांतील अनुभवांची उपयुक्तता

प्रश्न : प्रत्येक जन्मामध्ये मन, प्राण आणि शरीर नवीन असल्यामुळे, गत जन्मांमधील अनुभव त्याला कसे उपयोगी पडू शकतील? का आपल्याला त्या सगळ्या अनुभवांमधून पुन्हा एकदा जावे लागते? श्रीमाताजी : काही अगदी अपवादात्मक व्यक्ती आणि उत्क्रांतीची अतिप्रगत अवस्था वगळता – विकसित होणारा आणि जन्मोजन्मी प्रगत होत राहणारा असा चैत्य पुरुष असतो, मन वा प्राण नाही. तर […]