Entries by श्रीमाताजी

चेतनेचा विकास

प्रश्न : समजा एखाद्या व्यक्तीने एखाद्या जन्मात बुद्धिमान बनावे म्हणून खूप मेहनत केली, पण जर तो पुढच्या जन्मात निर्बुद्ध म्हणून जन्माला आला, तर त्याच्या त्या मेहनतीचा, परिश्रमांचा काय उपयोग? श्रीमाताजी : अशा व्यक्तीचा चैत्य पुरुष हा निर्बुद्ध नसतो. उदाहरणार्थ असे समजा की, त्या व्यक्तीच्या चैत्य पुरुषाने लेखक असण्याचा आणि त्यामुळे त्याचे अनुभव पुस्तकं आणि भाषणं […]

गत जन्मांतील अनुभवांची उपयुक्तता

प्रश्न : प्रत्येक जन्मामध्ये मन, प्राण आणि शरीर नवीन असल्यामुळे, गत जन्मांमधील अनुभव त्याला कसे उपयोगी पडू शकतील? का आपल्याला त्या सगळ्या अनुभवांमधून पुन्हा एकदा जावे लागते? श्रीमाताजी : काही अगदी अपवादात्मक व्यक्ती आणि उत्क्रांतीची अतिप्रगत अवस्था वगळता – विकसित होणारा आणि जन्मोजन्मी प्रगत होत राहणारा असा चैत्य पुरुष असतो, मन वा प्राण नाही. तर […]

गत जन्मांतील प्रगतीचे मोल

प्रश्न : जर मन, प्राण आणि शरीर हे पुन्हा जन्म घेणार नसतील आणि फक्त चैत्य पुरुषाचाच पुनर्जन्म होत असेल तर, मग आधी केलेल्या प्राणिक वा मानसिक प्रगतीचे पुढील जन्मासाठी काहीच मोल नाही का? श्रीमाताजी : ही अंगे चैत्य पुरुषाच्या जेवढी निकट आणली असतील तेवढ्याच प्रगतीच्या प्रमाणात त्यांचा उपयोग होतो; म्हणजे, जेवढ्या प्रमाणात अस्तित्वाची ही सारी […]

गत जन्मांचे स्मरण कोणाला?

श्रीमाताजी : पालक, वातावरण आणि परिस्थिती यांमुळे ज्याची घडण होते ते बाह्य अस्तित्व म्हणजे मानसिक, प्राणिक आणि शारीरिक अस्तित्व हे पुनर्जन्मामध्ये नव्याने जन्माला येत नाही; तर चैत्य पुरुष हा एका देहामधून दुसऱ्या देहामध्ये संक्रमित होत जातो. त्यामुळे, तर्कदृष्ट्या विचार केला तर, मानसिक किंवा प्राणिक अस्तित्वाला गत जन्मांचे स्मरण असू शकत नाही किंवा त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे […]

चैत्य जीवन आणि गतजीवनाची स्मृती

…अशीही काही माणसं असतात, जी थोडंफार काही शिकलेली असतात, ती कमी अधिक प्रमाणात गूढवादी असतात वा पुनर्जन्मावर त्यांचा बालीश विश्वास असतो. त्यांना असे वाटते की अशी एक छोटीशी व्यक्ती असते की जी, भौतिकाचे वस्त्र पांघरते, म्हणजे शरीर धारण करते आणि जेव्हा हे वस्त्र गळून पडते तेव्हा ती निघून जाते आणि नंतर परत दुसरे वस्त्र पुन्हा […]

गत जीवनांच्या स्मृती

प्रश्न : आपल्यापैकी किती जणांना मागील जीवनांचे स्मरण आहे? श्रीमाताजी : आपल्या चेतनेमधील काही भागांना स्मरण असते. पण हा खूप धोकादायक विषय आहे, कारण मानवी मनाला एकूणातच कल्पनारम्यतेची आवड असते. त्याला या पुनर्जन्माच्या सत्यतेविषयी माहिती मिळाल्याबरोबर, ते ताबडतोब त्याभोवती सुंदर कहाण्या रचू इच्छिते. अनेक जण तुम्हाला, हे जग कसे तयार झाले, ते भविष्यात कसे कसे […]

पुनर्जन्माबाबतची गैरसमजूत

पुनर्जन्माच्या बाबतीत बोलायचे झाले तर हे मान्य करावे लागेल की, सर्व बाबतीत एकसारखाच नियम लागू होत नाही. काही लोकं मृत्युनंतर लगेचच जन्माला येतात – जर मुले त्यांच्या पालकांशी खूपच अनुबद्ध (attached) असतील तर बरेचदा अशा पालकांमधील काही भाग हा त्यांच्या मुलांमध्ये सामावला जातो. काही लोकांना मात्र, पुन्हा जन्माला येण्यासाठी शतकं आणि कधीकधी तर हजारो वर्षेही […]

पुनर्जन्म ही तार्किकदृष्ट्या आवश्यक गोष्ट

प्रश्न : माताजी, आपण पुनर्जन्मावर विश्वास का ठेवतो? श्रीमाताजी : ज्यांना गत जीवनांचे स्मरण आहे त्यांनी पुनर्जन्म ही वस्तुस्थिती असल्याचे घोषित केले आहे. आत्ताच्या देहामध्ये असलेली ही चेतना, याआधीच्या जन्मांमध्ये इतर देहांद्वारेही अभिव्यक्त झालेली होती आणि या देहाच्या अंतानंतरही ती टिकून राहणार आहे, हे जाणण्याइतपत ज्यांच्या आंतरिक चेतनेचा विकास झाला आहे, असे आजवर पुष्कळ जण […]

परम परोपकार

प्रेमगुणांच्या उपयोजनातून निर्धारित झालेली मूर्त आणि व्यवहार्य अशी कृती म्हणजे परोपकार ! कारण नेहमीच अशी एक शक्ती असतेच असते, की जी सर्वांमध्ये वितरित करता येणे शक्य असते, अर्थात ती अत्यंत व्यक्तिनिरपेक्ष रूपात प्रदान केली गेली पाहिजे. ती शक्ती म्हणजे प्रेम, ज्यामध्ये प्रकाशाचा आणि जीवनाचा समावेश असेल असे प्रेम; म्हणजेच बुद्धिमता, आरोग्य, बहरुन येण्याच्या सर्व शक्यता. […]

परमविज्ञान (श्रीमाताजीकृत प्रार्थना)

जेव्हा भौतिक परिस्थिती ही काहीशी कठीण असते असते आणि त्यातून काहीशी अस्वस्थता येते अशा वेळी, त्या परमेश्वराच्या इच्छेसमोर पूर्णतः समर्पित कसे व्हायचे हे जर व्यक्तीला माहीत असेल, म्हणजे जीवन किंवा मृत्यू, आरोग्य किंवा आजारपण, याच्याविषयी यत्किंचितही काळजी न करता, जर व्यक्ती समर्पित होऊ शकली तर, तिचे समग्र अस्तित्व त्वरेने त्या ईश्वराच्या जीवन आणि प्रेमाच्या कायद्याच्या […]