पती-पत्नीमधील एकत्वाचे गुपीत
तुमची लौकिक जीवने, तुमच्या ऐहिक आवडीनिवडी यांचा मेळ घालणे, जीवनातील अडीअडचणी, यशापयश, ह्या साऱ्यांना एकत्रितपणे सामोरे जाण्यासाठी दोघांनी सहचर बनणे – हा विवाहसंस्थेचा खरा पाया आहे पण हे एवढेच पुरेसे नाही ह्याची तुम्हाला जाणीव आहेच. दोघांच्या संवेदना एकसारख्या असणे, दोघांची सौंदर्यविषयक अभिरुची सारखीच असणे, त्याचा एकत्रित आस्वाद घेणे, दोघांना एकसमान गोष्टी भावणे, परस्परांनी परस्परांच्या माध्यमातून […]






