Entries by श्रीमाताजी

आश्रम आणि ऑरोविल

आश्रम ही मध्यवर्ती चेतना आहे, तर ऑरोविल ही अनेक बाह्य अभिव्यक्तींपैकी एक आहे. दोन्ही ठिकाणी दिव्यत्वासाठीच कर्म केले जाते. आश्रमवासीयांना त्यांचे त्यांचे कार्य असते आणि ते इतके कार्यव्याप्त आहेत की त्यातील बहुतेकांकडे ऑरोविलला देण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. प्रत्येक जण आपापल्या कामात व्यग्र असलाच पाहिजे; कोणत्याही सुयोग्य संघटनेसाठी (Organisation) ही बाब अनिवार्य आहे. * प्रश्न : […]

ऑरोविलवासी होण्यासाठी प्रवेशपात्रता

०१) प्रश्न : ऑरोविलच्या निर्मितीसाठी कोणी पुढाकार घेतला आहे? श्रीमाताजी : परमेश्वराने. ०२) प्रश्न : ऑरोविलच्या अर्थसाहाय्यामध्ये कोणाचा सहभाग आहे? श्रीमाताजी : परमेश्वराचा. ०३) प्रश्न : एखाद्या व्यक्तीला ऑरोविलमध्ये राहावयाचे असेल तर त्यासाठी त्याच्याकडून काय अपेक्षित आहे? श्रीमाताजी : सर्वोच्च पूर्णता गाठण्याचा प्रयत्न करणे. ०४) प्रश्न : एखाद्याला ऑरोविलमध्ये राहवयाचे असेल तर तो योगभ्यासाचा विद्यार्थी […]

पती-पत्नीमधील एकत्वाचे गुपीत

तुमची लौकिक जीवने, तुमच्या ऐहिक आवडीनिवडी यांचा मेळ घालणे, जीवनातील अडीअडचणी, यशापयश, ह्या साऱ्यांना एकत्रितपणे सामोरे जाण्यासाठी दोघांनी सहचर बनणे – हा विवाहसंस्थेचा खरा पाया आहे पण हे एवढेच पुरेसे नाही ह्याची तुम्हाला जाणीव आहेच. दोघांच्या संवेदना एकसारख्या असणे, दोघांची सौंदर्यविषयक अभिरुची सारखीच असणे, त्याचा एकत्रित आस्वाद घेणे, दोघांना एकसमान गोष्टी भावणे, परस्परांनी परस्परांच्या माध्यमातून […]

पाकशास्त्राची प्रयोगशाळा

ऑरोविलमधील अन्नाविषयीची संकल्पना स्पष्ट करताना श्रीमाताजी म्हणतात : काही गोष्टी खरोखरच रोचक असतात; सर्वप्रथम, उदाहरणादाखल, मला असे वाटते की, ऑरोविलमध्ये प्रत्येक देशाचा त्याचा त्याचा एक मंडप असेल, आणि त्या मंडपात त्या त्या देशाचे खाद्यपदार्थ असतील – जसे की, जपानी लोकांना वाटले तर ते त्यांच्या मंडपात जपानी पद्धतीचे खाणे खाऊ शकतील. तसेच तेथे भविष्यकालीन अन्नाविषयी संशोधन […]

सत्यशोधनाचा अधिकार

प्रश्न : धर्मसंकल्पनेचा संबंध बरेचदा भगवंताच्या शोधाशी जोडला जातो. फक्त ह्याच संदर्भात धर्म जाणून घ्यावा काय? वस्तुस्थिती पाहता, आजकाल धर्माची इतरही रूपे अस्तित्वात आहेत ना? श्रीमाताजी : विश्वातील किंवा जगतातील एखादी संकल्पना जेव्हा एकमेवाद्वितीय सत्य या स्वरूपात प्रस्तुत केली जाते तेव्हा तिला आपण ‘धर्म’ असे नाव देतो. त्यावर व्यक्तीने निरपवादपणे श्रद्धा ठेवलीच पाहिजे अशी अपेक्षा […]

ऑरोविलच्या निर्मितीमध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक अट

इत:पर कोणतीही व्यक्तिगत मालमत्ता न बाळगल्यामुळे येणारी मुक्ती आणि आनंद काय असतो तो जाणून घेण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठी, ऑरोविल हे आदर्श स्थान आहे. (CWM 13 : 202) * ऑरोविलमध्ये व्यक्ती सुखसोयी आणि इच्छातृप्ती या गोष्टींसाठी येत नाही; चेतनेचा विकास करण्यासाठी तसेच ज्या परमसत्याचा साक्षात्कार करून घ्यावयाचा आहे, त्या परमसत्याला समर्पित होण्यासाठी ती येत असते. […]

सुव्यवस्था, सुमेळ, सौंदर्य यांसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा

आपण सुव्यवस्था, सुमेळ, सौंदर्य… आणि सामुदायिक अभीप्सा यांसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे – तूर्तास तरी ह्या गोष्टी इथे नाहीत. इतरांकडून जशा वागण्याची आपण अपेक्षा बाळगतो त्याचे उदाहरण आपण स्वत: घालून देणे, हे आपले संयोजक या नात्याने कर्तव्य आहे. आपण वैयक्तिक प्रतिक्रियांच्या वर उठले पाहिजे. दिव्य संकल्पाशी अनन्यभावे आपला सूर जुळवून घेत, आपण त्या दिव्य इच्छेचे […]

जीवनास नकार नको

जे लोक जीवनापासून निवृत्त होतात, आध्यात्मिक जीवनाच्या प्राप्तीसाठी लौकिक जीवनाचा परित्याग करतात त्यांचा मार्ग म्हणजे गूढ साधनेचा मार्ग असे मला म्हणावयाचे आहे. हे लोक लौकिक आणि आध्यात्मिक ह्या दोन्ही जीवनांमध्ये फारकत करतात आणि म्हणतात “एक तर हे नाहीतर ते दुसरे.” आम्ही म्हणतो, “यात तथ्य नाही.” जीवनामध्येच आणि पूर्णपणे, समग्रतेने जीवन जगत असतांनाच व्यक्ती आध्यात्मिक जीवन […]

परमसत्याची आस

बहुतेक जण त्यांना जे काही हवे असते त्यालाच सत्य असे नाव देतात. सत्य काही का असेना, ऑरोविलवासीयांनी त्या परमसत्याची आस बाळगावयास हवी. धर्म कोणताही असो, प्राचीन वा अर्वाचीन, नवीन वा भावी, ज्याने अशा सर्व धर्मांचा परित्याग केला आहे व मूलत: जे दिव्य जीवन जगण्याची इच्छा बाळगतात अशा लोकांकरता ऑरोविल आहे. ‘सत्या’चे ज्ञान केवळ अनुभूतीनेच होऊ […]

आपल्याला जीवन परिवर्तित करावयाचे आहे.

आपल्याला जीवन परिवर्तित करावयाचे आहे. आपल्याला त्यापासून पळून दूर जावयाचे नाही… ज्याला देव म्हणतात त्याला जाणून घेण्याचा, त्याच्या सान्निध्यात येण्याचा आजवर ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला त्यांनी त्यांनी जीवनाचा त्याग केला आहे. ते असे म्हणतात, ‘जीवन हे आध्यात्मिक प्रगतीत एक अडथळा आहे. ईश्वरप्राप्तीकरता जीवनाचा त्याग करायलाच हवा.” म्हणून, तुम्हाला भारतात सर्वसंग परित्याग केलेले संन्यासी दिसतात; युरोपमध्ये […]