Entries by श्रीमाताजी

,

आत्म-संयम आणि निष्ठा

धम्मपद : वास्तविक जी व्यक्ती अजूनही अशुद्ध आहे. अजूनही जिच्या ठिकाणी आत्म-संयम आणि निष्ठा यांचा अभाव आहे, अशी व्यक्ती खरंतर भिक्षुची पीत वस्त्र धारण करण्याच्या योग्यतेची नसते. श्रीमाताजी : बौद्ध धर्म ज्याला अशुद्धी म्हणून संबोधतो, त्यात मुख्यत: अहंकार आणि अज्ञान या गोष्टींचा अंतर्भाव होतो; कारण बौद्धांच्या दृष्टिकोनातून, सर्वात मोठा कलंक म्हणजे अज्ञान; पण बाह्य गोष्टींचे […]

,

मनावरील नियंत्रण

धम्मपद : बैलगाडी ओढणाऱ्या बैलांच्या खुरामागोमाग ज्याप्रमाणे बैलगाडीची चाके जातात त्याचप्रमाणे, व्यक्ती जर दुष्ट मनाने बोलत वा वागत असेल तर, त्याच्या पाठी दुःखभोग लागतात. श्रीमाताजी : सद्यकालीन विश्वात, सामान्य मानवी जीवन हे मनाच्या सत्तेने चालते; त्यामुळे मनावर ताबा मिळविणे, संयम मिळविणे ही सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट आहे; म्हणून आपले मन विकसित करण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी […]

निर्णायक निवड

आज आहे तो मानववंश तसाच कायम ठेवण्याची प्रकृतीची जी मागणी आहे, तिचे आज्ञाधारकपणे पालन करण्यासाठी, हा देह प्रकृतीच्या साध्यपूर्तीसाठी स्वाधीन करावयाचा का, ह्याच देहाला एका नूतन वंशाच्या निर्मितीसाठीचे एक पुढचे पाऊल म्हणून तयार करावयाचे, ह्यामधील निर्णायक निवड करावी लागेल. ह्या दोन्ही बाबी एकत्रितपणे असू शकत नाहीत; प्रत्येक क्षणाला तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागतो की, तुम्ही […]

उषानगरी

धीर धरा ! प्रतिदिनी प्रात:काळी आपल्या पहिल्या किरणांच्या द्वारा उगवता दिनमणी जी शिकवण, जो संदेश अवनीला देतो तो ऐका; तो आशेचा किरण देतो; सांत्वनपर संदेश आणतो. अशी कोणतीच निशा नाही की, जिच्या अंती उषेचा उदय होत नाही; अंधकार जेव्हा अति घनदाट होतो त्याचवेळी उषेचे आगमन होण्याची तयारी झालेली असते. * उगवणारी प्रत्येक उषा नव्या प्रगतीची […]

मानवी एकतेतून शांती

एकसारखेपणातून एकता हा खुळचटपणा आहे. अनेकांच्या युतीमधून एकता प्रत्यक्षात उतरावयास हवी. प्रत्येक जण त्या एकतेचा एक भाग असेल; प्रत्येक जण त्या ‘पूर्णा’साठी अपरिहार्य असेल. * प्रत्येक मनुष्याकडे त्याचा स्वत:चा उपाय असतो, परंतु तीच मोठी समस्या असते. प्रत्येकाकडे स्वत:चा असा उपाय असला तरी सत्यामध्ये जीवन व्यतीत करावयाचे असेल तर, हे सर्वच उपाय एकत्रितपणे काम करू शकतील, […]

ऑरोविलचे केन्द्रस्थान

हा बारा बाजू असणारा रेखीव असा एक प्रकारचा मनोरा आहे, जो वर्षातील बारा महिन्यांचे प्रतीक आहे. तो संपूर्णतया रिकामा आहे… शंभर-दोनशे लोक सामावू शकतील एवढी त्याची क्षमता असणे आवश्यक आहे. त्यानंतर, आतल्या बाजूला, (बाहेरून नव्हे) छताला आधार देणारे बारा स्तंभ असतील, आणि अगदी मधोमध, जिच्यावर चित्त एकाग्र करावयाचे अशी वस्तु असेल. आणि संपूर्ण वर्षभर, सूर्याने […]

मातृमंदिर – प्रतीकात्मक अर्थ

(मातृमंदिर ज्या स्तंभावर उभारलेले आहे त्या चार स्तंभांचा अर्थ) उत्तर दिशा – महाकाली पूर्व दिशा – महालक्ष्मी दक्षिण दिशा – महेश्वरी पश्चिम दिशा – महासरस्वती * (मातृमंदिराच्या पायापासून सभोवती असलेल्या बारा भुयारी कक्षांचा अर्थ) मन:पूर्वकता, विनम्रता, कृतज्ञता, चिकाटी, अभीप्सा, ग्रहणशीलता, प्रगती, धैर्य, चांगुलपणा, औदार्य, समत्व (समभाव), शांती. * (मातृमंदिराच्या भोवती असणाऱ्या बारा उद्यानांचा अर्थ) अस्तित्व, […]

मातृमंदिर

(मातृमंदिराच्या पायाचा चिरा बसवतांना माताजींनी दिलेला संदेश) “दिव्यत्वाप्रत ऑरोविलची जी अभीप्सा आहे त्या अभीप्सेचे मातृमंदिर हे जिवंत प्रतीक ठरो.” * मातृमंदिर हे ऑरोविलचा आत्मा असेल. जेवढ्या लवकर हा आत्मा येथे विराजमान होईल तेवढे ते प्रत्येकासाठी आणि विशेषेकरुन ऑरोविलवासीयांसाठी अधिक श्रेयस्कर राहील. * मानवाच्या पूर्णत्वप्राप्तीच्या अभीप्सेला, भगवंताने दिलेल्या प्रत्युत्तराचे प्रतीक बनणे ही मातृमंदिराची मनिषा आहे. भगवंताशी […]

ऑरोविलवासीयांसाठी संदेश

ऑरोविलच्या व्याख्येतच ‘सौहार्दपूर्ण वातावरण’ अंतर्भूत आहे; अशा वातावरणाचे साम्राज्य येथे प्रस्थापित होण्यासाठी पहिले पाऊल हे आहे की, ज्याने त्याने आपल्या स्वत:मध्येच संघर्ष आणि गैरसमजांचे कारण शोधले पाहिजे. संघर्ष आणि गैरसमज ह्याची कारणे नेहमीच दोन्ही बाजूंनी असतात आणि इतरांकडून कशाची अपेक्षा करण्यापूर्वी, प्रत्येकाने स्वत:मधील त्या कारणांचे निर्मूलन करण्यासाठी जोरकस प्रयत्न करावयास हवेत. – श्रीमाताजी (CWM 13 […]

युनेस्कोच्या समितीसाठी लिहिण्यात आलेला मसुदा

श्रीअरविंदांच्या क्रांतदर्शी दृष्टीला जे दर्शन झाले होते त्याला मूर्त रूप देण्याचे कार्य श्रीमाताजींवर सोपविण्यात आले होते. नवचेतनेला अभिव्यक्त करणाऱ्या आणि तिला मूर्त रूप देणाऱ्या एका नवीन जगताच्या, एका नव्या मानवतेच्या, एका नवीन समाजाच्या निर्मितीचे कार्य त्यांनी हाती घेतले आहे. मूलत:च हा एक असा सामूहिक आदर्श आहे की, जो सामूहिक प्रयत्नांसाठी साद घालत आहे; जेणेकरून मानवी […]