Entries by श्रीमाताजी

धर्म आणि अध्यात्म – ०४

श्रीमाताजी : तुम्ही तुमचे सर्व नातेसंबंध हे तुमच्या आंतरिक निवडीच्या स्वातंत्र्यानुसार नव्याने निर्माण केले पाहिजेत. तुम्ही ज्या परंपरेमध्ये जन्माला आला आहात किंवा मोठे झाला आहात ती परिस्थिती तुमच्यावर वातवारणाच्या दबावाने किंवा सामान्य मनाद्वारे वा इतरांच्या निवडीद्वारे लादण्यात आलेली आहे. तुमच्या मौनसंमतीमध्ये देखील सक्तीचा एक भाग असतो. धर्म हा देखील माणसांवर लादण्यात येतो, त्याला धार्मिक भीतीच्या […]

धर्म आणि अध्यात्म – ०३

अध्यात्माचा, अतिमानसाचा, सामान्य मानवी चेतनेच्या अतीत असणाऱ्या आणि त्या उच्च क्षेत्रामधून जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या गोष्टीचा वेध घेणे म्हणजे ‘धर्म’ अशी धर्माची व्याख्या श्रीअरविंदांनी केली आहे. अशा रीतीने, धर्म तर्कबुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या गोष्टींचा वेध घेत असल्याने धर्म हा तर्कातीत असतो. त्यामुळे धर्माच्या क्षेत्रामध्ये तर्कबुद्धीचा कसा काय पाडाव लागणार ? त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा की, एखाद्याने धर्माच्या […]

धर्म आणि अध्यात्म – ०२

प्रश्न : ज्यांची चेतना सामान्य आहे अशा माणसांसाठी धार्मिक विधी महत्त्वाचे असतात का? श्रीमाताजी : धार्मिक विधी म्हणजे तुला काय म्हणावयाचे आहे? प्रश्नकर्ता : जप वगैरे गोष्टी. श्रीमाताजी : ओह ! ती तर अगदीच सापेक्ष गोष्ट आहे. त्या गोष्टींचा तुमच्यावर काय परिणाम होतो आणि तुम्ही त्यावर किती विश्वास ठेवता, यावरच त्यांचे मूल्य अवलंबून असते. जर […]

धर्म आणि अध्यात्म – ०१

प्रश्न : धर्माचे स्वरूप नेमके काय आहे? आध्यात्मिक जीवनमार्गातील तो अडथळा आहे का? श्रीमाताजी : मानवतेच्या उच्चतर मनाशी धर्माचा संबंध असतो. मानवाचे उच्च मन, त्याच्या पलीकडे जे आहे त्याच्या पर्यंत पोहोचण्याचा स्वत:च्या क्षमतेनुसार प्रयत्न करत असते. मानव ज्याला ईश्वर वा चैतन्य वा सत्य वा श्रद्धा वा ज्ञान वा अनंत, केवल अशा नावांनी संबोधतो, ज्याच्या पर्यंत […]

,

परिपूर्ण मुक्ती

पूर्णयोग आणि बौद्धमत – २३ श्रीमाताजी : धम्मपदामध्ये एका गोष्टीचा उल्लेख झालेला नाही; ती गोष्ट म्हणजे आत्मपरिपूर्णता. परम निर्लिप्तता (Supreme Disinterestedness) आणि परम मुक्ती (Supreme Liberation) ह्या नंतर आत्मपरिपूर्णतेची (Self-perfection) साधना अनुसरली पाहिजे. येथे ‘निर्वाणाची मुक्ती’ हे नियोजित साध्य आहे, असे सांगण्यात आले आहे, परंतु ते तसे नसून प्रगतीची वाटचाल करीत राहणे, प्रगतिपथावर वाटचाल करीत […]

,

अष्टपदी मार्ग

पूर्णयोग आणि बौद्धमत – २२ (कालचे वचन हे, दु:खभोगापासून मुक्तता ज्यामुळे घडून येईल त्या चार तत्त्वांशी आणि अष्टपदी मार्गाशी संबंधित होते. काल आपण ती चार उदात्त तत्त्वे विचारात घेतली. आता, श्रीमाताजींनी अष्टपदी मार्गाविषयी – अष्टांग मार्गाविषयी – जे विवेचन केले आहे ते पाहू.) श्रीमाताजी : उदात्त मार्गामध्ये पुढील आठ पायऱ्यांच्या प्रशिक्षणाचा समावेश होतो. १) सम्यक […]

,

चार उदात्त तत्त्वं

पूर्णयोग आणि बौद्धमत – २१ धम्मपद : भयभीत होऊन माणसं पर्वतराजींमध्ये, अरण्यामध्ये, वनराजींमध्ये, मठमंदिरांमध्ये, ठिकठिकाणी आश्रय घेतात. पण हा सुरक्षित आश्रय नाही, हा सर्वोच्च आश्रय नाही. ह्या आश्रयस्थानी येऊनही माणसाचा दु:खभोगापासून बचाव होऊ शकत नाही. जो बुद्धाचा, धम्माचा आणि संघाचा पूर्णज्ञानानिशी आश्रय घेतो, त्याला चार उदात्त तत्त्वांचा बोध होतो – १) दुःखभोग २) दुःखभोगाचे मूळ […]

,

आत्मदान

पूर्णयोग आणि बौद्धमत – १९ (धम्मपदातील कालच्या वचनाचे विवेचन करताना, त्याची अकरणात्मक बाजू (Negative) आधी श्रीमाताजींनी सांगितली. ती आपण काल विचारात घेतली. आता त्या सकारात्मक बाजू (Positive) सांगत आहेत. वाचकांच्या सोयीसाठी धम्मपदातील ते वचन पुन्हा देत आहोत.) धम्मपद : नैतिक नियमांचे पालन करून, किंवा बहुविध प्रकारच्या ज्ञानाने, किंवा ध्यानधारणेच्या सरावाने किंवा विजनवासातील जीवन जगण्याने किंवा […]

,

वासनामुक्ती

पूर्णयोग आणि बौद्धमत – १८ धम्मपद : नैतिक नियमांचे पालन करून, किंवा बहुविध प्रकारच्या ज्ञानाने, किंवा ध्यानधारणेच्या सरावाने किंवा विजनवासातील जीवन जगण्याने किंवा “जे या संसारी जगात जगतात त्यांना अनभिज्ञ असलेला असा मुक्तीचा आनंद मला लाभला आहे” असा विचार करणाऱ्या व्यक्तीला भिक्षु म्हटले जात नाही. भिक्षुंनो, सावध असा, जोपर्यंत तुम्ही सर्व इच्छावासनांचा निरास करीत नाही […]

,

भलेपणावरील प्रेम

पूर्णयोग आणि बौद्धमत – १७ धम्मपद : जो नेहमीच दुसऱ्यांच्या दोषांवर टिका करतो आणि त्याने संत्रस्त होऊन जातो तो स्वत:च्या दोषांपासून मुक्त होण्याऐवजी, उलट स्वत:चे अवगुण अधिकच वाढवितो. श्रीमाताजी : जर तुम्ही सरळ मार्गाचा अवलंब करू पाहात असाल, तुम्ही विनम्र असाल, तुम्ही शुद्धतेसाठी प्रयत्नशील असाल, जर तुम्ही निरपेक्ष असाल, तुम्हाला एकांतवासाचे जीवन जगावयाचे असेल, तुम्हाला […]