Entries by श्रीमाताजी

अमर्त्यत्वाचा शोध ३३

आपल्यामधील अमर्त्य तत्त्व बहुसंख्य लोकं जेव्हा ‘मी’ असे म्हणत असतात तेव्हा तो त्यांचा एक अंश असतो, त्यांच्या भावनांचा, त्यांच्या शरीराचा, त्यांच्या विचारांचा एक अंश असतो, तो त्रयस्थपणे बोलत असतो; आणि हा बोलणारा सतत बदलत असतो. त्यामुळे त्यांचे ‘मी’ अगणित असतात किंवा त्यांचा ‘मी’ नेहमीच बदलत असतो. असे असेल तर मग, नित्य असणारे असे त्यांच्यामध्ये काय […]

अमर्त्यत्वाचा शोध ३२

पृथ्वीवर अमर्त्यत्वाचे आविष्करण मानव प्रथमतः जेव्हा निर्माण करण्यात आला तेव्हा अहम् हा एकीकरण करणारा घटक होता. या अहंभोवतीच अस्तित्वाच्या विविध अवस्थांचे वर्गीकरण करण्यात आले होते; परंतु आता जेव्हा अतिमानवतेच्या (superhumanity) जन्माची तयारी चालू आहे, तेव्हा अहंला नाहीसे व्हावेच लागेल, त्याने चैत्य पुरुषाला (Psychic Being) वाट करून देणे आवश्यक आहे ; मानवामध्ये दिव्यत्वाचे आविष्करण व्हावे म्हणून […]

अमर्त्यत्वाचा शोध ३१

अमर्त्यत्व म्हणजे काय ?   अमर्त्यत्व म्हणजे मृत्युनंतर मानसिक व्यक्तिमत्त्व टिकून राहणे नव्हे, (अर्थात तेही खरंच आहे) तर अमर्त्यत्व म्हणजे, शरीर हे ज्याचे केवळ एक साधन असते, एक छाया असते त्या अजन्मा आणि मृत्युहीन असलेल्या आत्म्याचे जागृत आधिपत्य असते. (श्रीअरविंदलिखित या वचनावर भाष्य करताना श्रीमाताजी म्हणतात) …अमर्त्यत्व म्हणजे अनादी आणि अनंत असे जन्मरहित किंवा मृत्युरहित […]

अमर्त्यत्वाचा शोध २६

मृत्युच्या भीतीवर मात कशी करावी? – १० आता आपण सर्वात भयंकर अशा लढाईकडे वळतो; देहामध्ये लढले जाणारे हे शारीरिक युद्ध, कोणत्याही विश्रांतीविना किंवा कोणत्याही तहाविना सुरु असते. हे युद्ध जन्माबरोबरच सुरू होते आणि दोन प्रतिस्पर्ध्यांपैकी एकाच्या पराभवानेच ते संपुष्टात येणे शक्य असते. एकतर रूपांतरण-शक्तीचा (force of transformation) पराभव होतो किंवा विघटन-शक्तीचा (force of disintegration) पराभव […]

अमर्त्यत्वाचा शोध २५

मृत्युच्या भीतीवर मात कशी करावी? – ०९ भावनांनंतर येतात संवेदना. येथे ही लढाई निर्दयी होते आणि समोरचे शत्रू क्रूर असतात. त्यांना तुमच्यातील अगदी लहानातल्या लहान दुर्बलतेचा देखील सुगावा लागू शकतो आणि तुम्ही जेथे संरक्षणविहीन असता तेथे ते शत्रू नेमकेपणाने हल्ला चढवितात. तुम्ही जे विजय मिळविता ते क्षणभंगुर ठरतात आणि पुन्हा पुन्हा त्याच त्याच लढाया तुम्हाला […]

अमर्त्यत्वाचा शोध २४

मृत्युच्या भीतीवर मात कशी करावी? – ०८ दुसरी लढाई असते ती भावनांची लढाई असते. व्यक्ती ज्यावर प्रेम करत असते, व्यक्तीने जे जे काही निर्माण केलेले असते, त्याविषयी असलेल्या आसक्तीच्या विरोधात ही लढाई असते. खूप मोठ्या परिश्रमाने, बरेचदा महत्प्रयासांनी तुम्ही तुमचे घर, कारकीर्द, काही सामाजिक, साहित्यिक, कलाविषयक, विज्ञानविषयक किंवा काही राजकीय कार्य उभे केलेले असते ; […]

अमर्त्यत्वाचा शोध २३

मृत्युच्या भीतीवर मात कशी करावी? – ०७ पहिली लढाई लढायची तीच मुळात भीषण असते; सामूहिक सूचनेच्या विरोधात ही मानसिक लढाई असते. प्रकृतीच्या अजूनपर्यंत निरपवाद भासणाऱ्या एका नियमावर आधारित, हजारो वर्षांच्या अनुभवांवर आधारित अशा प्रचंड आणि दबाव टाकणाऱ्या, सक्ती करणाऱ्या सामूहिक सूचनेविरुद्ध ही लढाई असते. “मृत्यू हा कायमचाच आहे, तो वेगळा असा काही असूच शकत नाही; […]

अमर्त्यत्वाचा शोध २२

मृत्युच्या भीतीवर मात कशी करावी? – ०६ आणि शेवटी ते लोक, जे उपजतच योद्धे असतात. जीवन जसे आहे तसे ते स्वीकारूच शकत नाहीत; त्यांना त्यांचा अमर्त्यतेचा अधिकार, पूर्ण आणि पार्थिव अमर्त्यतेचा अधिकार त्यांच्या अंतरंगातूनच स्पंदित होताना जाणवत असतो. मृत्यू म्हणजे एका वाईट सवयीखेरीज अन्य काही नाही याचे त्यांना एक प्रकारचे अंतर्बोधात्मक ज्ञान असते; आणि मृत्युवर […]

अमर्त्यत्वाचा शोध २१

मृत्युच्या भीतीवर मात कशी करावी? ०५ ज्यांची देवावर, त्यांच्या देवावर श्रद्धा आहे आणि ज्यांनी आपले जीवन देवाला वाहिले आहे अशा व्यक्तींसाठी तिसरी एक पद्धत आहे. अशा व्यक्ती पूर्णतः ईश्वराच्या झालेल्या असतात; त्यांच्या जीवनातील साऱ्या घटना या ईश्वरी इच्छेची अभिव्यक्ती असतात आणि अशा व्यक्ती त्या साऱ्या घटना केवळ शांतचित्ताने स्वीकारतात असे नाही तर,त्या घटनांचा स्वीकार त्या […]

अमर्त्यत्वाचा शोध १९

मृत्युच्या भीतीवर मात कशी करावी? – ०३ पहिली पद्धत तर्काला आवाहन करणारी आहे. असे म्हणता येईल की, जगाची जी सद्यकालीन स्थिती आहे त्यामध्ये मृत्यू अपरिहार्य आहे; देहाने जन्म घेतला आहे तर अगदी अनिवार्यपणे तो एक ना एक दिवस नष्ट होणारच आहे आणि प्रत्येक वेळी बघा, जेव्हा मृत्यू येणे आवश्यक असतो तेव्हाच तो येतो; मृत्युची घटिका […]