Entries by श्रीमाताजी

धर्म – प्रत्येक व्यक्तीगणिक भिन्न

विचार शलाका – ०७ व्यक्तीमध्ये एकदा का विचाराची शक्ती आली की, तेथे ताबडतोब क्षणोक्षणीच्या ह्या अगदी पशुवत अशा दैनंदिन जीवनापेक्षा काहीतरी उच्चतर अशी आकांक्षा अपरिहार्यपणे त्याच्यामध्ये उदय पावते; आणि त्यातूनच त्याला जगण्याची उमेद आणि ऊर्जा प्राप्त होते. ही गोष्ट समूहांप्रमाणेच व्यक्तींनादेखील लागू पडते. त्या समूहाच्या धर्माच्या, त्याच्या ध्येयांच्या मूल्यावर, म्हणजे, ज्याला ते त्यांच्या अस्तित्वाची सर्वोच्च […]

धर्माची आवश्यकता

विचार शलाका – ०६ प्रश्न : माताजी, सामान्य माणसाच्या जीवनात धर्माची आवश्यकता आहे का? श्रीमाताजी : समाजजीवनात या गोष्टीची आवश्यकता असते, कारण सामूहिक अहंकारावर उपाय म्हणून धर्माचा उपयोग होतो, या नियंत्रणाविना हा सामूहिक अहंकार प्रमाणाबाहेर वाढू शकतो. व्यक्तीच्या चेतनेच्या पातळीपेक्षा सामूहिक चेतनेची पातळी नेहमीच निम्न असते. हे लक्षात येण्यासारखे आहे, उदा. जेव्हा माणसं मोठ्या संख्येने […]

आजारपण कसे थोपवावे?

विचार शलाका – ०५ प्रश्न : आजारपण येणार असे वाटत असेल तर, व्यक्तीने ते कशा प्रकारे थोपवावे? श्रीमाताजी : सर्वप्रथम, तुम्हाला आणि तुमच्या शरीरातील कोणालाच ते हवे असता कामा नये. आपण आजारीच पडता कामा नये, अशी तुमच्यामध्ये अतिशय प्रबळ इच्छाशक्ती असली पाहिजे. ही पहिली अट आहे. दुसरी अट अशी की, प्रकाशाला, साम्यावस्थेच्या प्रकाशाला, शांतीच्या, स्थिरतेच्या […]

विचाररूपी आकार

विचार शलाका – ०१ विचारांना आकार, रूप (form) असते आणि त्यांचे स्वतःचे असे एक व्यक्तिगत जीवन असते. ते त्यांच्या रचयित्यापासून स्वतंत्र असते. ते विचार त्या रचयित्याकडूनच या विश्वामध्ये प्रवाहित करण्यात आलेले असतात आणि त्यांच्या अस्तित्वाच्या प्रयोजनाची परिपूर्ती करण्यासाठी म्हणून ते विचार या विश्वामध्ये फिरत राहतात. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीचा विचार करत असता, तेव्हा तुमचा तो […]

परमशोधाची इच्छा

साधनेची मुळाक्षरे – २२ तुम्ही कोणतीही गोष्ट करत असलात तरी, तुम्ही जे ध्येय तुमच्या स्वत:समोर ठेवले आहे त्या ध्येयाचा कधीही विसर पडू देऊ नका. एकदा का तुम्ही या महान शोधासाठी प्रवृत्त झालात की, कोणतीच गोष्ट लहान वा थोर नसते; सर्व गोष्टी सारख्याच महत्त्वाच्या असतात आणि त्या एकतर तुम्हाला त्वरेने यश मिळवून देऊ शकतात किंवा त्या […]

साधनेची सूत्रे

साधनेची मुळाक्षरे – २१ आध्यात्मिक गोष्टींचे आकलन करण्यासाठी मन अक्षम असते. आणि तरीसुद्धा, या पूर्णयोगाच्या मार्गावर प्रगत व्हायचे असेल तर, सर्व मानसिक मतमतांतरे आणि प्रतिक्रिया यांपासून स्वत:ला दूर राखणे, अगदी अनिवार्य असते. सुखसोयी, समाधान, मौजमजा, आनंद यासाठीची सर्व धडपड सोडून द्या. केवळ प्रगतीचा एक धगधगता अग्नी बनून राहा. जे काही तुमच्यापाशी येईल ते तुमच्या प्रगतीसाठी […]

आनंद हीच विजयाची खूण

साधनेची मुळाक्षरे – २० (श्रीमाताजी येथे भक्तिभावातून होणाऱ्या प्रगतीविषयी सांगत आहेत.) भक्तीची भावना अंतःकरणात असेल तर अशा व्यक्तीला अडथळे, अडचणी यांच्या धक्क्यांची देखील तमा वाटत नाही. ते तुमचे काय वाईट करू शकणार? …व्यक्ती त्याची गणतीच करत नाही. इतकेच नव्हे, कधीकधी तर ती त्यावर हसतेसुद्धा. अधिक वेळ लागला तर त्याने तुम्हाला काय फरक पडणार आहे? अधिक […]

श्रद्धा आणि ईश्वरी कृपा

साधनेची मुळाक्षरे – १९ (श्रीमाताजींनी अगोदर शारीरिक आरोग्य, शरीराची स्वास्थ्यकारक वृत्ती, शरीराची जडणघडण याविषयी विवेचन केले आहे आणि त्यानंतर आरोग्य आणि ईश्वरी कृपा यासंबंधी त्या विवेचन करत आहेत.) व्यक्तीच्या अंतरंगात जर ‘ईश्वरी कृपे’विषयी अशी श्रद्धा असेल की, ईश्वरी कृपा माझ्याकडे पाहत आहे आणि काहीही झाले तरी ईश्वरी कृपा आहेच, आणि ती माझ्यावर लक्ष ठेवून आहे […]

हसतमुखाने सामोरे जा

साधनेची मुळाक्षरे – १६ जे कोणी दुःखकष्ट सहन करत आहेत, त्यांना हीच गोष्ट सांगायला हवी की, सारे दुःखकष्ट याच गोष्टीचे निदर्शक आहेत की, तुमचे समर्पण परिपूर्ण नाही. आणि मग, जेव्हा तुम्हाला कधीतरी एकदम धक्का बसतो, तेव्हा, “अरेरे, हे खूपच वाईट आहे” किंवा ‘’ही परिस्थिती खूपच कठीण आहे,’’ असे म्हणण्याऐवजी जर तुम्ही असे म्हणालात की, ”माझे […]

आत्म-निवेदन कसे असावे?

साधनेची मुळाक्षरे – ०७ आपण का जगतो हे जाणून घेणे म्हणजे ‘ईश्वरा’चा शोध घेणे आणि ‘त्याच्या’शी जागृत ऐक्य पावणे; केवळ याच साक्षात्कारावर लक्ष एकाग्र करण्याची अभीप्सा बाळगणे; सर्व प्रकारच्या परिस्थितीचे रूपांतरण ध्येयप्राप्तीपर्यंत पोहोचण्याच्या साधनांमध्ये कसे करायचे हे जाणून घेणे. * प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण हा एका नवीन आणि पूर्णतर अशा आत्मनिवेदनाचे निमित्त झाला पाहिजे. आणि […]