Entries by श्रीमाताजी

आजारपण आणि योगमार्ग

सद्भावना – २४ प्रश्न : आजारपण येणे म्हणजे योगमार्गातील परीक्षा असते का? श्रीमाताजी : परीक्षा? अजिबातच नाही. प्रगती करावी म्हणून व्यक्तीला हेतुपुरस्सर आजारपण देण्यात येते का? नाही, नक्कीच ते तसे नाही. वास्तविक, तुम्ही हीच गोष्ट दुसऱ्या बाजूने विचारात घेतली पाहिजे आणि मग तुम्ही असे म्हणू शकता की, काही माणसं अशीही असतात की, ज्यांची अभीप्सा इतकी […]

चैत्य अस्तित्वातून आलेली प्रेरणा

सद्भावना – २३ केवळ चैत्य अस्तित्वातून आलेली प्रेरणाच खरी असते. प्राण आणि मन यांच्याकडून येणाऱ्या प्रेरणा या निश्चितपणे अहंकारमिश्रित असतात आणि अनियंत्रित असतात. बाहेरील संपर्काला प्रतिक्रिया म्हणून व्यक्तीने कृती करता कामा नये तर, प्रेमाच्या आणि सद्भावनेच्या अपरिवर्तनीय (Immutable) दृष्टिकोनातून कृती केली पाहिजे. – श्रीमाताजी (CWM 14 : 334)

प्राणाचे साहाय्य व प्रगती

सद्भावना – २२ सर्वांत बाह्यवर्ती शारीरिक चेतना आणि चैत्य चेतना (Psychic Consciousness) या दोहोंमध्ये नित्य संपर्क प्रस्थापित करणे हे स्वाभाविकपणेच अतिशय कठीण असते. आणि या शारीरिक चेतनेपाशी भरपूर सद्भावना असते; ती अतिशय नियमित असते, ती खूप धडपड करते, पण ती मंद आणि जड असते, तिला खूप वेळ लागतो, ती प्रगत होणे कठीण असते. ती थकत […]

अधिकाची आस

सद्भावना – २१ व्यक्तीने अगदी दक्ष आणि पूर्णपणे स्व-नियंत्रित असले पाहिजे, पूर्ण धीरयुक्त असले पाहिजे आणि कधीही अपयशी न होणारी सद्भावना तिच्याकडे असली पाहिजे. व्यक्तीकडे विनम्रतेची अगदी छोटीशी मात्रा का असेना, पण व्यक्तीने तिच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये आणि स्वतःकडे असलेल्या प्रामाणिकतेवर कधीच संतुष्ट असता कामा नये. व्यक्तीला नेहमीच अधिकाची आस असली पाहिजे. – श्रीमाताजी […]

समत्वाचे उदाहरण

सद्भावना – २० विद्यार्थ्यांसमोर आदर्श उदाहरण ठेवा. ते जसे घडावेत असे तुम्हाला वाटते तसे आधी तुम्ही स्वतः बना. तुम्ही निरपेक्षपणाचे, सहनशीलतेचे, आत्म-नियंत्रणाचे, स्वतःच्या छोट्याछोट्या वैयक्तिक नापसंतींवर मात करण्याचे, सातत्यपूर्ण चांगल्या खेळकर विनोदाचे, सातत्यपूर्ण सद्भावनेचे, इतरांच्या अडचणी समजून घेण्याचे उदाहरण त्यांच्या नजरेसमोर ठेवा; स्वभावातील समत्वाचे उदाहरण त्यांना घालून द्या की, ज्यामुळे मुलं भयमुक्त होतील. भीतीमुळेच ती […]

जीवन जगण्याची कला

सद्भावना – १९ जीवन योग्य पद्धतीने जगणे ही एक अतिशय अवघड कला आहे आणि व्यक्तीने अगदी लहान असतानाच ती कला शिकायला प्रारंभ केला नाही, आणि तसे वागण्याचा प्रयत्न केला नाही तर, व्यक्तीला ती कला कधीच चांगल्या प्रकारे अवगत होत नाही. स्वतःच्या शरीराचे आरोग्य सुस्थितीत राखणे, मन शांत ठेवणे आणि अंतःकरणामध्ये सद्भावना बाळगणे – या गोष्टी […]

पदाधिकाऱ्यांचे आचरण

सद्भावना – १८ अहंकारावर मात करण्याचा प्रयत्न करणे हा प्रत्येक व्यक्तीच्या अस्तित्वाचा पाया झाला पाहिजे, विशेषतः जे जबाबदारीच्या पदांवर आहेत आणि ज्यांना इतरांची काळजी घ्यावी लागते अशांच्या बाबतीत तर त्याची अधिकच आवश्यकता असते. जो प्रमुख आहे त्याने नेहमी उदाहरण घालून दिले पाहिजे, त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांकडून ते ज्या गुणांची अपेक्षा बाळगतात ते गुण प्रमुखांनी […]

नेमून दिलेल्या दोन अटी

सद्भावना – १७ मी दोन अटी नेमून देत आहे. प्रगती करण्याची इच्छा असणे – ही खरोखरच अगदी साधीशी अट आहे. प्रगती करण्याची इच्छा असणे, तसेच अजून प्रत्येक गोष्ट पूर्ण व्हायची आहे, प्रत्येक गोष्टीवर विजय प्राप्त करून घ्यायचा आहे, हे ज्ञात असणे, ही पहिली अट. दुसरी अट अशी की, दररोज कोणतीतरी एखादी अशी कृती, असे एखादे […]

योगमार्गात प्रवेश करण्यापूर्वीच विचार करा.

सद्भावना – १३ एकदा तुम्ही (योगमार्गाच्या वाटचालीस) सुरुवात केलीत की मग मात्र तुम्ही अगदी अंतापर्यंत गेलेच पाहिजे. माझ्याकडे मोठ्या उत्साहाने जेव्हा लोकं येतात तेव्हा मी कधीकधी त्यांना सांगते की, “थोडा विचार करा, हा मार्ग सोपा नाही, तुम्हाला वेळ लागेल, धीर धरावा लागेल. तुमच्याकडे तितिक्षा (Endurance) असणे गरजेचे आहे, पुष्कळशी चिकाटी आणि धैर्य आणि अथक अशी […]

सद्भावनेचा परिणाम

सद्भावना – १२ प्रश्न : सद्भावनेच्या स्पंदनाने व्यक्ती जगाला मदत करू शकते का? श्रीमाताजी : सद्भावनेच्या साहाय्याने व्यक्ती अनेक गोष्टी बदलू शकते, फक्त ती सद्भावना अत्यंत शुद्ध आणि निर्भेळ असली पाहिजे. हे तर उघडच आहे की, एखादा विचार, एखादी अतिशय शुद्ध आणि सच्ची प्रार्थना जर विश्वात प्रसृत झाली तर ती तिचे कार्य करतेच. परंतु हा […]