Entries by श्रीमाताजी

सभान जगणे

विचार शलाका – ०८ “अमुक एक विचार मी का केला? मला असे का वाटले? किंवा मी असे का केले?”, असे प्रश्न जर तुम्ही स्वत:लाच विचारलेत तर, १०० पैकी ९९ वेळा उत्तर नेहमी सारखेच येते. ते म्हणजे “काय माहीत? घडले खरं असे!” म्हणजेच असे म्हणता येईल की, बहुतेकदा तुम्ही अजिबात भानावर नसता. तुम्ही जेव्हा इतरांसोबत वावरत […]

,

अहंकारविरहित जीवन

विचार शलाका – ०७ अहंकार स्वत:चा अधिकार सोडण्यास नकार देतो त्यामुळेच जीवनात नेहमी सर्व तऱ्हेची कटुता येते. * सारे जे काही घडत असते, ते आपल्याला केवळ एकमेव धडा शिकविण्यासाठीच घडत असते; तो म्हणजे, जर आपण अहंकाराचा त्याग केला नाही तर शांती ना आपल्याला मिळेल, ना इतरांना! आणि तेच, जीवन जर अहंकारविरहित असेल तर तो एक […]

ईश्वरी’ संरक्षणाचा मार्ग

विचार शलाका – ०६ सच्च्या साधकभावाने जे जीवन व्यतीत करतात, जे ‘ईश्वरा’ठायीच त्यांची चेतना आणि एकाग्रता दृढ ठेवतात, फक्त ‘ईश्वर’ हेच ज्यांचे साध्य असते, जे दास्य भावाने ‘ईश्वरा’ची सेवा करतात, जे ‘ईश्वरा’शी संपूर्णतया एकनिष्ठ असतात, केवळ त्यांनाच ‘ईश्वर’ संरक्षण देऊ शकतो. एखाद्याचा आवडीनिवडींचा, सुखसोयींचा आग्रह, दांभिकपणा, अप्रामाणिकपणा व मिथ्याचार यांच्या सर्व गतिविधी इत्यादी वासना या […]

दु:खभोगाचे आनंदात रुपांतर

विचार शलाका – ०३ सर्व वेदना, दुःखभोग, संकटे, चिंता, अज्ञान आणि सर्व प्रकारच्या अक्षमता, दुर्बलता ह्या गोष्टी विलगतेच्या भावनेतून आल्या आहेत. संपूर्णतया केलेले आत्मदान, संपूर्ण आत्मनिवेदनात (consecration) झालेला ‘मी’चा विलय, यामुळे दुःखभोग नाहीसे होतात आणि त्याची जागा, आनंदाने घेतली जाते की, जो कशानेही झाकोळला जात नाही. आणि असा आनंद जेव्हा या जगामध्ये स्थापित होईल, तेव्हाच […]

आपपर भाव

सद्भावना – ३० जोवर तुमच्यामध्ये दुसऱ्यांविषयी आपपर भाव शिल्लक असतो तोवर निश्चितपणे तुम्ही ‘सत्या’च्या परिघाबाहेर असता. तुम्ही कायमच तुमच्या हृदयात सद्भाव आणि प्रेमभाव जतन केला पाहिजे. आणि प्रगाढ शांतीने आणि समतेने त्यांचा सर्वांवर वर्षाव केला पाहिजे. – श्रीमाताजी (CWM 13 : 191)

चिंतामुक्त जीवन

सद्भावना – २९ साधे असणे खूप चांगले असते, फक्त सदिच्छा बाळगायची, आपल्याला करता येणे शक्य असेल ती उत्तमातील उत्तम गोष्ट आपण करायची आणि ती गोष्ट शक्य तेवढ्या सर्वोत्तम रीतीने करायची. त्यासाठी फार वेगळे असे काही करण्याची गरज नाही; फक्त प्रगतीसाठी, प्रकाशासाठी, सद्भावनापूर्ण शांतीसाठी अभीप्सा बाळगायची. आणि आपण काय केले पाहिजे आणि आपण कोण झाले पाहिजे […]

चूक व निवड

सद्भावना – २८ एखादी गोष्ट चुकीची आहे हे माहीत नसताना जर ती गोष्ट तुमच्याकडून घडली असेल तर, तेव्हा तुम्ही ती चूक अज्ञानापोटी केलेली असते आणि म्हणून हे साहजिकच आहे की, नंतर जेव्हा तुम्हाला ती गोष्ट चुकीची होती हे समजते, आणि जेव्हा तुमचे अज्ञान नाहीसे झालेले असते तसेच तुमच्यापाशी सद्भाव असतो तेव्हा, तुम्ही तीच चूक परत […]

सद्भावनेचे सर्वत्र दर्शन

सद्भावना – २७ एकदोन दिवसांपूर्वी ‘पवित्र’ (श्रीमाताजींचे एक ज्येष्ठ शिष्य) जेव्हा पत्रांची जुळवाजुळव करत होते तेव्हा, मी इंग्रजीत कोणाला तरी लिहिलेले एक पत्र त्यांच्या पाहण्यात आले. त्यात असे लिहिले होते की, “जी व्यक्ती आपल्या चेतनेमध्ये सद्भावना बाळगते त्या व्यक्तीला, ती सद्भावना स्वतःहून सर्व वस्तुमात्रांमध्ये गुप्त असलेल्या सद्भावनेचे सर्वत्र दर्शन घडविते. भावनेचा भविष्याकडे थेटपणे घेऊन जाणारा […]

प्राणाच्या दोन प्रवृत्ती

सद्भावना – २६ (प्राणामध्ये (Vital) दोन प्रवृत्ती आढळतात – एक म्हणजे निराशेची आणि दुसरी अतिउत्साहाची. या दोन प्रवृत्तींना कसे हाताळावे, याविषयी चर्चा सुरू असताना, श्रीमाताजी पुढे सांगत आहेत…) अगदी काळजीपूर्वक टाळलाच पाहिजे असा हा एक मोठा अडथळा आहे. असमाधानाचे किंवा चिडचिडेपणाचे अगदी बारीकसे लक्षण जरी आढळले तरी, लगेचच आपण आपल्या प्राणाला असे सांगितले पाहिजे की, […]

खात्रीलायक आणि मोलाचे मार्गदर्शन

सद्भावना – २५ व्यक्ती ज्यावेळी अतिशय सतर्क आणि अतिशय प्रामाणिक असते तेव्हा, तिने हाती घेतलेल्या कामाचे किंवा ती करत असलेल्या कृतीचे मूल्य किती आहे किंवा काय आहे यासंबंधी, तिला एखादी आंतरिक पण सुस्पष्ट सूचना मिळू शकते. खरोखर, जिच्यापाशी पुरेपूर सद्भावना आहे अशी एखादी व्यक्ती असेल म्हणजे जी व्यक्ती अत्यंत प्रामाणिकपणाने, तिच्या अस्तित्वाच्या समग्र जाणिवयुक्त भागानिशी, […]