Entries by श्रीमाताजी

खरी विश्रांती

विचार शलाका – २० मानवी प्रकृतीमध्ये असलेली – निष्क्रियता, जडत्व, आळस, अल्पसंतुष्टता, सर्व प्रयत्नांबद्दल असेलेले वैर – यांविरुद्ध लढा दिला पाहिजे असे श्रीअरविंद येथे (Thoughts and Glimpses मधील उताऱ्यात) सांगत आहेत. बरेचदा संघर्षाची भीती वाटते म्हणून शांतीचे भोक्ते बनलेल्या आणि ही शांती प्राप्त करून घेण्यापूर्वीच विश्रांतीची इच्छा बाळगणाऱ्या व्यक्ती आपण जीवनांत पाहतो. अशा व्यक्ती अल्पशा […]

पार्थिव अस्तित्वाचे औचित्य

विचार शलाका – १९ व्यक्ती दिव्यत्वाचा साक्षात्कार करून घेण्यासाठी या पृथ्वीवर आलेली असते, हेच त्याच्या पार्थिव अस्तित्वाचे औचित्य आहे. अन्यथा या प्रयोजनाविना त्याचे पार्थिव जीवन म्हणजे एक राक्षसीपणा ठरला असता. ‘ईश्वरा’चा पुनर्शोध घेणे आणि स्वत:च ‘तो’ बनणे, ‘त्या’चे आविष्करण करणे, बाह्य जीवनात सुद्धा ‘त्या’चा अनुभव घेणे हे सर्वश्रेष्ठ प्रयोजन (जीवनात) नसते, तर हे पार्थिव जीवन […]

तथाकथित ‘व्यावहारिक’ साधने

विचार शलाका – १८ मानवता आज ज्या भयानक गर्तेत बुडाली आहे, त्यापासून तिला वाचविण्यासाठी चेतनेचे आमूलाग्र परिवर्तन होणेच आवश्यक आहे, दुसरे काहीही तिला त्यापासून वाचवू शकणार नाही. सर्व तथाकथित ‘व्यावहारिक’ साधने म्हणून जी सांगितली जातात ती साधने म्हणजे माणसांनी डोळ्यांवर पट्टी बांधून स्वत:लाच आंधळे बनविण्यासारखा बालीशपणा आहे, की ज्यामुळे ते खऱ्या आवश्यकतेकडे व रामबाण उपायाकडे […]

अडीअडचणीतून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग

विचार शलाका – १६ श्रीमाताजी : हे जग संघर्ष, दुःखभोग, अडचणी, ताणतणाव यांचे बनलेले आहे. ते अजूनही बदललेले नाही, ते बदलण्यासाठी काही काळ लागेल. आणि प्रत्येकाला या सगळ्यांतून बाहेर पडण्याची संधी उपलब्ध असते. जर तुम्ही ‘परमोच्च कृपे’च्या सान्निध्यावर विसंबून राहिलात, तिच्यासमोर नतमस्तक झालात तर तोच एकमेव मार्ग आहे… प्रश्न : पण हे असे सामर्थ्य कोठे […]

माझे समर्पण परिपूर्ण नाहीये

विचार शलाका – १५ …सर्व दुःखं ही समर्पण परिपूर्ण न झाल्याचे लक्षण असते. मग जेव्हा तुम्हाला तुमच्या आत असा एक ‘आघात’ जाणवतो तेव्हा ‘अरे, हे वाईट झाले किंवा परिस्थिती कठीण आहे’ असे म्हणण्याऐवजी तुम्ही म्हणता, “माझे समर्पण परिपूर्ण नाहीये.” तेव्हा ते म्हणणे योग्य ठरेल. आणि मग तुम्हाला ती ‘कृपा’ जाणवते, जी तुम्हाला मदत करते, मार्गदर्शन […]

परिवर्तन

विचार शलाका – १४ आपल्या चेतनेचे जेव्हा परिवर्तन होईल तेव्हाच परिवर्तन म्हणजे काय ते आपल्याला कळेल. * परिवर्तन… ०१. द्वेषाचे परिवर्तन सुसंवादामध्ये ०२. मत्सराचे परिवर्तन औदार्यामध्ये ०३. अज्ञानाचे परिवर्तन ज्ञानामध्ये ०४. अंधाराचे परिवर्तन प्रकाशामध्ये ०५. असत्याचे परिवर्तन सत्यामध्ये ०६. दुष्टपणाचे परिवर्तन चांगुलपणामध्ये ०७. युद्धाचे परिवर्तन शांततेमध्ये ०८. भीतीचे परिवर्तन निर्भयतेमध्ये ०९. अनिश्चिततेचे परिवर्तन निश्चिततेमध्ये १०. […]

नियती बदलता येते?

विचार शलाका – १३ योगसाधनेद्वारे व्यक्तीला नियतीचा केवळ वेधच घेता येतो असे नाही, तर व्यक्ती तिच्यात फेरफार करून नियतीला जवळपास पूर्णपणे बदलूनही टाकू शकते. सर्वप्रथम, योगशास्त्र आपल्याला असे शिकविते की, आपण म्हणजे एकसंध, साधेसुधे अस्तित्व नसतो; आणि त्यामुळे अनिवार्यपणे, आपली नियती देखील साधीसुधी, तर्कसंगत म्हणता येईल अशी एकच एक असत नाही. उलट आपण हे समजून […]

…त्या क्षणीच सारे दुःखभोग संपून जातात.

विचार शलाका – ११ आपण कोणीच नाही, आपण काहीच करू शकत नाही, आपले अस्तित्वच नाही, आपण काहीच नाही, दिव्य ‘चेतना’ आणि दिव्य ‘कृपा’ यांच्याविना कोणते अस्तित्वच नाही हे खोलवर कळण्यासाठी आयुष्यात कितीतरी टक्केटोणपे खावे लागतात. आणि ज्या क्षणी माणसाला हे उमगते, त्या क्षणीच सारे दुःखभोग संपून जातात, त्याचवेळी साऱ्या अडचणी दूर होतात. एखाद्याला जेव्हा हे […]

अहंकार – कारण आणि परिणाम

विचार शलाका – १० स्वत:च्या अहंकारामध्ये जो जगतो, स्वत:च्या अहंकारासाठी जो जगतो, स्वत:चा अहंकार सुखावेल या आशेने जो जगतो तो मूर्ख असतो. तुम्ही जोपर्यंत अहंकाराच्या वर उठत नाही, जेथे अहंकाराची आवश्यकताच उरत नाही, अशा चेतनेच्या एका विशिष्ट अवस्थेप्रत जोपर्यंत तुम्ही पोहोचत नाही; तोपर्यंत ध्येय प्राप्त होईल अशी आशाच तुम्ही बाळगू शकत नाही. एके काळी व्यक्तिगत […]

अहंकाराशी लढा

विचार शलाका – ०९ अगदी क्षुल्लक गोष्टीनेदेखील असमाधानी होणाऱ्या तुमच्या अहंकाराला, तुमच्या अस्तित्वाची दारे उद्दाम आणि उद्धट अविश्वासाच्या अशुभ वृत्तीकडे उघडण्याची सवयच लागते की ज्यामुळे तो, जे जे पवित्र व सुंदर असते त्यावर, विशेषत: तुमच्या जिवाच्या अभीप्सेवर आणि ‘परमेश्वरी कृपे’कडून मिळणाऱ्या मदतीवर, चिखलफेक करण्यात काळाचा अपव्यय करतो. हे असेच चालू दिले तर त्याचा शेवट हा […]