Entries by श्रीमाताजी

, ,

अहंकारावर मात

कृतज्ञता – २८ कृतज्ञता व्यक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपण आपल्यामधील अहंकारावर मात केली पाहिजे आणि या रूपांतरणाच्या दिशेने सातत्यपूर्ण प्रयत्न केले पाहिजेत. ‘इतरजण तरी कुठे रूपांतरित झाले आहेत,’ या सबबीखाली मानवी अहंभाव स्वतःचा परित्याग करण्यास नकार देतो. परंतु ही एक प्रकारे त्याच्यावर असणारी दुरिच्छेची पकड असते, कारण इतर काय करतात किंवा काय करत नाहीत […]

तत्त्व किंवा इच्छावासना

कृतज्ञता – २७ अहंकारी मनाचा दृष्टिकोन असा असतो की, माझ्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी साऱ्या जगाचे नुकसान झाले तरी हरकत नाही. असे अहंकारी मन त्याची तत्त्वे साऱ्यांवर लादू पाहत असते. दिव्य दृष्टीला मात्र, तत्त्व किंवा इच्छावासना, एकसारख्याच भासतात. कारण तिच्या दृष्टीने, इच्छावासना म्हणजे प्राणाचा लहरीपणा असतो तर तत्त्व हा मनाचा लहरीपणा असतो. – श्रीमाताजी (CWM 14 […]

कृतज्ञ शरणागती

कृतज्ञता – २६ (एक साधक श्रीमाताजीच्या ‘चार तपस्या आणि चार मुक्ती’ लेखामधील पुढील वचन वाचतो…) “…अशा व्यक्ती पूर्णतः ईश्वराच्या झालेल्या असतात; त्यांच्या जीवनातील साऱ्या घटना या ईश्वरी इच्छेची अभिव्यक्ती असतात आणि त्या साऱ्या घटना अशा व्यक्ती केवळ शांत शरणागतीने स्वीकारतात असे नाही तर, त्या घटनांचा स्वीकार त्या व्यक्ती कृतज्ञतेने करतात; कारण त्यांच्या बाबतीत जे काही […]

सदिच्छायुक्त भावनेने अर्पण केलेली कृती

कृतज्ञता – २५ निराशा आपल्याला कोठेच घेऊन जात नाही. सुरुवातीलाच एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आपण स्वतःलाच एक गोष्ट सांगितली पाहिजे की, आपण प्रगती करत आहोत की नाही, हे जाणण्यासाठी आपण पूर्णतः अक्षम असतो. कारण आपल्याला जेव्हा साचलेपण (stagnation) आल्यासारखे वाटते तेव्हा ती स्थिती बरेचदा दीर्घकाळाची असू शकते, परंतु ती निश्चितच अंतहीन नसते तर ती […]

कृतज्ञतापूर्वक प्रार्थना

कृतज्ञता – २४ प्रार्थना ही बरीचशी बाह्य गोष्ट आहे, ती बहुधा कोणत्यातरी एका विशिष्ट बाबीसंबंधी असते आणि ती नेहमीच सूत्रबद्ध असते कारण सूत्रातून प्रार्थना तयार होते. एखादी व्यक्ती जर अभीप्सा बाळगत असेल; आणि जरी ती त्या व्यक्तीला प्रार्थनेसमान भासत असेल तरीही प्रार्थनेपेक्षा ‘अभीप्सा’ सर्वच बाबतीत कितीतरी सरस ठरते. अभीप्सा ही प्रार्थनेपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात ‘ईश्वरा’च्या […]

कृतज्ञता व्यक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग

कृतज्ञता – २३ कधीकधी व्यक्ती अगदी उदारतेने केलेली एखादी कृती पाहते, जगावेगळे असे काहीतरी तिच्या कानावर पडते; उदारता, आत्म्याची थोरवी किंवा एखाद्या धाडसी वीराने केलेली कृती व्यक्ती पाहते, कधीकधी काही विशेष प्रतिभासंपन्न अशा गोष्टी ती पाहते किंवा एखादी गोष्ट अत्यंत असाधारण पद्धतीने, सुंदरतेने केली असल्याचे व्यक्ती पाहते, ते करणाऱ्या व्यक्तीशी तिची गाठभेठ होते; अशा प्रत्येक […]

कृतज्ञतेचा आनंद

कृतज्ञता – २२ व्यक्तीच्या आत्मदानामध्ये एक महान शुद्धी आणि एक उत्कटता असली पाहिजे, ‘तसेच आपल्यासाठी काय हिताचे आहे, काय नाही, हे आपल्यापेक्षा ‘ईश्वरा’ला अधिक चांगले कळते,’ असा ईश्वरी ‘कृपे’च्या परमप्रज्ञेविषयी एक प्रगाढ विश्वास व्यक्तीला असला पाहिजे. आणि मग असे सारे असताना, व्यक्तीने स्वतःची अभीप्सा अर्पण करताना, स्वतः ला पुरेशा उत्कटतेने ईश्वराप्रत झोकून दिले तर त्याचे […]

कृतज्ञतेविना भक्ती अपूर्ण

कृतज्ञता – २१ तुमच्यामध्ये भक्तिभाव असतो आणि तरीही तुम्ही तुमचा अहंकारही सांभाळत राहता. आणि नंतर मग हा अहंकारच तुम्हाला भक्तीच्या माध्यमातूनसुद्धा अनेक प्रकारच्या गोष्टी करायला भाग पाडतो, अगदी अत्यंत अहंकारी गोष्टी करायलासुद्धा भाग पाडतो. म्हणजे असे की, तुम्ही फक्त तुमचाच विचार करत राहता, इतरांचा नाही, जगाचा नाही, कार्याचाही नाही किंवा जे करायला हवे त्याचाही नाही […]

संतमंडळींचे कृतज्ञ स्मरण

कृतज्ञता – २० रोज सकाळी तुम्ही जेव्हा झोपून उठता तेव्हा, तुमच्या दिवसाची सुरुवात तुम्ही मानववंशाचे त्राते असणाऱ्या महान समुदायाविषयी कृतज्ञतेने, प्रेमाने आणि स्तुतीने करा. (येथे श्रीमाताजी आध्यात्मिकतेची शिकवण देणाऱ्या संतमंडळींबद्दल सांगत आहेत.) ते सारे एकसारखेच असतात. पूर्णत्वाची अवघड चढण चढता येण्यासाठी मदत करावी या हेतुने ते मार्गदर्शक म्हणून, प्रशिक्षक म्हणून, त्यांच्या बांधवांचे विनम्र आणि अद्भुत […]

प्रेमाला प्रेमाने प्रतिसाद

कृतज्ञता – १९ (धम्मपदातील एका वचनाबद्दल श्रीमाताजी भाष्य करीत आहेत…) मी तुम्हाला आश्चर्याचा धक्का देणार आहे. तो असा की, हे जग बदलावे म्हणून जर द्वेषभावनेला प्रेमभावनेने प्रत्युत्तर द्यायचे असेल तर, प्रेमाला प्रेमाने प्रतिसाद द्यावा हे अधिक जास्त स्वाभाविक नाही का? हे जीवन, कृती आणि माणसांची हृदये जशी आहेत तशीच विचारात घेतली तर, ‘ईश्वरी कृपा’ या […]