Entries by श्रीमाताजी

प्रामाणिकपणा – ४५

प्रामाणिकपणा – ४५ तुम्हाला घरी राहून आणि कार्यमग्न असतानादेखील साधना करणे शक्य आहे. त्यासाठी सुरुवातीला ही गोष्ट आवश्यक असते की, जितके जमेल तितके श्रीमाताजींचे स्मरण ठेवावे, शक्य असेल तेवढा, त्या ‘दिव्य माता’ आहेत असा विचार करून, दररोज एका ठरावीक वेळी हृदयामध्ये श्रीमाताजींवर लक्ष एकाग्र करा, त्या तुमच्यामध्येच आहेत अशी जाणीव तुम्हाला व्हावी म्हणून अभीप्सा बाळगा. […]

प्रामाणिकपणा – ४४

प्रामाणिकपणा – ४४ तुम्ही तुमचे कर्म ‘ईश्वरा’च्या चरणांशी पूर्ण प्रामाणिकपणे अर्पण केलेत तर, तुमचे कर्म हे ध्यानाइतकेच महत्त्वाचे ठरेल. * तुम्ही प्रामाणिक राहा, मग आवश्यकताच पडली तर तुमच्या चुका हजार वेळासुद्धा सुधारण्याची माझी तयारी आहे. * जेव्हा जेव्हा एखाद्या ठिकाणी प्रामाणिकपणा असतो तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तेथे तुम्हाला साहाय्य मार्गदर्शन लाभतेच. तुम्हाला प्रतिसाद देण्यासाठी […]

प्रामाणिकपणा – ४२

प्रामाणिकपणा – ४२ तुमची इच्छा नसतानासुद्धा जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा, तुम्ही केली पाहिजे अशी पहिली गोष्ट म्हणजे, तो आवेग पुन्हा येऊ नये ही इच्छा बाळगली पाहिजे. पण या उलट, ती गोष्ट नाहीशी होऊच नये असे तुम्हाला प्रामाणिकपणे वाटत असेल, तर ती गोष्ट तशीच ठेवा, मात्र मग योगसाधना करण्याचा प्रयत्न करू नका. सर्व अडीअडचणींवर […]

प्रामाणिकपणा – ३९

प्रामाणिकपणा – ३९ पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी, भयविरहित शौर्य असणे आवश्यकच आहे. तुम्ही क्षुद्र, क्षुल्लक, दुर्बल आणि कुरूप स्पंदनामुळे म्हणजेच भीतीमुळे या मार्गाकडे कधीही पाठ फिरविता कामा नये. तुमच्या ठायी दुर्दम्य धैर्य, परिपूर्ण प्रामाणिकपणा असला पाहिजे, तुमचे संपूर्ण आत्मदान अशा कोटीचे असावे की, त्याची कोणतीही गणना किंवा तुलना होता कामा नये. तुम्ही दिलेले दान हे […]

प्रामाणिकपणा – ३८

प्रामाणिकपणा – ३८ प्रामाणिकपणा, सचोटी, निःस्वार्थीपणा, जे कार्य करायचे आहे त्या कार्याबद्दल असलेले निरपेक्ष समर्पण, चारित्र्याची उदात्तता आणि सरळपणा हा आपल्या ‘पूर्णयोगा’चा अपरिहार्य असा पाया आहे. या प्राथमिक गुणांचे पालन जे लोक करत नाहीत ते श्रीअरविंदांचे शिष्य असूच शकत नाहीत… – श्रीमाताजी [CWM 13 : 123]

प्रामाणिकपणा – ३७

प्रामाणिकपणा – ३७ तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर समस्या शिल्लक राहात नाही. प्रश्न असतो फक्त प्रामाणिकपणाचा! तुम्ही जर प्रामाणिक नसाल तर योगाची सुरुवातच करू नका. मानवी व्यवहारांमध्ये फसवणूक होऊ शकते, पण ‘ईश्वरा’बरोबरच्या संबंधांमध्ये फसवणुकीची अजिबात शक्यताच नसते. तुम्ही जर विनम्र असाल आणि अंतरंगातून खुले असाल आणि […]

प्रामाणिकपणा – ३६

प्रामाणिकपणा – ३६ आपण ‘ईश्वरा’ला फसवू शकत नाही हे आपल्याला कळते. अत्यंत हुशार असा ‘असुर’सुद्धा ‘ईश्वरा’ला फसवू शकत नाही. पण हे सारे समजत असूनदेखील, आपण पाहतो की, जीवनात बरेचदा – दिवसाच्या धावपळीत आपण स्वत:लाच फसविण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपल्याला त्याची जाणीवसुद्धा नसते, अगदी सहजपणे, अगदी आपोआप आपण अशी फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असतो. व्यक्ती […]

प्रामाणिकपणा – ३२

प्रामाणिकपणा – ३२ प्रामाणिकपणा हा जगामधील इतका दुर्मिळ गुण आहे की, जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये तो गुण आढळून येतो तेव्हा त्या व्यक्तीसमोर आपण नतमस्तक झालेच पाहिजे. आपण ज्याला प्रामाणिकपणा म्हणतो, त्या प्रामाणिकपणामध्ये परिपूर्ण सचोटी आणि पारदर्शकता असते. त्या व्यक्तीमध्ये ढोंगीपणाचा लवलेशही नसतो, ती व्यक्ती कोणतीही लपवाछपवी करत नाही किंवा स्वतः कोणीही नसताना, मी कोणीतरी आहे असे […]

प्रामाणिकपणा – ३१

प्रामाणिकपणा – ३१ प्रामाणिकपणा हा खऱ्या साक्षात्काराचा पाया आहे, तो साक्षात्काराचे साधन आहे, तोच मार्ग आहे आणि प्रामाणिकपणा हेच ध्येय देखील आहे. तुमच्याकडे प्रामाणिकपणा नसेल तर तुम्ही असंख्य घोडचुका करत राहता आणि तुम्ही स्वतःला आणि इतरांना जी हानी पोहोचविलेली असते, त्याचे तुम्हाला सातत्याने निवारण करत बसावे लागते, हे नक्की. – श्रीमाताजी [CWM 08 : 399]

प्रामाणिकपणा – ३०

प्रामाणिकपणा – ३० तुमच्या साधनेमध्ये काय महत्त्वाचे असते तर, पावलोपावली आवश्यक असणारा प्रामाणिकपणा; तुमच्यापाशी जर असा प्रामाणिकपणा असेल तर चुका झाल्या तरी फारसे काही बिघडत नाही, कारण चुका दुरूस्त केल्या जाऊ शकतात. पण जर थोडासुद्धा अप्रामाणिकपणा असेल तर त्यामुळे साधना एकदम निम्न स्तरावर खेचली जाते. पण, प्रामाणिकपणा अविरत आहे का अथवा कोणत्या एखाद्या क्षणी तुम्ही […]