Entries by श्रीमाताजी

इच्छाजयाचा आनंद

इच्छापूर्तीपेक्षा इच्छेवर विजय मिळविण्यामध्ये अधिक आनंद आहे असे बुद्धाने म्हटले आहे. हा अनुभव प्रत्येक जण घेऊ शकतो, कारण तो अनुभव खरोखरच रोचक असतो. कोणा एका स्त्रीला पॅरीसमध्ये मॅसिनेटच्या ऑपेराच्या पहिल्या प्रयोगाला बोलाविण्यात आले होते. बहधा मॅसिनेटच्या…हो बहुधा, आता मला नक्की आठवत नाही की तो कोणाचा ऑपेरा होता. त्याचा विषय उत्तम होता, प्रयोगही उत्तम होता, संगीतही […]

विरोधी शक्तींचे हल्ले

तुम्ही जेवढे अधिक अचंचल (quieter) व्हाल, तेवढे तुम्ही अधिक शक्तिशाली व्हाल. समत्व हा सर्व आध्यात्मिक शक्तींचा दृढ पाया आहे. तुमची बैठक मोडू शकेल अशा कोणत्याही गोष्टीला तुम्ही थारा देता कामा नये; तुम्ही तसे करू शकलात, तर मग होणाऱ्या सर्व हल्ल्यांच्या प्रतिकार तुम्ही करू शकता. तसेच, त्याच्या जोडीला जर तुमच्याकडे पुरेसा विवेक असेल आणि जेव्हा अनिष्ट […]

बाह्य अस्तित्वातील समतेचा पाया

प्रश्न : कोणत्या गोष्टीला तुम्ही, ‘बाह्य अस्तित्वातील समतेचा पाया’ असे म्हणत आहात? श्रीमाताजी : उत्तम आरोग्य, सुदृढ आणि संतुलित देह हा ‘बाह्य अस्तित्वातील समतेचा पाया’ असतो; एवढेसे काही झाले की एखादी लहानगी मुलगी जशी घाबरून जाते तशी व्यक्तीची मनोवस्था नसेल; एखादी व्यक्ती जेव्हा व्यवस्थित झोप घेते, व्यवस्थित अन्नसेवन करते… जेव्हा व्यक्ती शांत असते, संतुलित असते, […]

बाह्य समत्व आणि आत्म्याचे समत्व

प्रश्न : बाह्य समत्व आणि आत्म्याचे समत्व यामध्ये काय फरक आहे ? श्रीमाताजी : आत्म्याचे समत्व ही मनोवैज्ञानिक गोष्ट आहे. सर्व घटना मग त्या चांगल्या असोत की वाईट, दुःखीकष्टी न होता, नाउमेद न होता, उतावीळ आणि अस्वस्थ न होता, सहन करण्याची शक्ती म्हणजे आत्म्याचे समत्व. समत्व असले की, काहीही घडले तरी तुम्ही प्रसन्न, शांत राहता. […]

कठीण समय

माणसांना स्वतःच्या क्षुद्र अशा वैयक्तिक अहंकारावर मात करण्यास भाग पाडावे आणि त्याकरता साहाय्य व प्रकाश मिळविण्यासाठी, माणसं पूर्णतः केवळ ईश्वराकडेच वळावीत म्हणून पृथ्वीवर ‘कठीण समय’ येतो. माणसांची दृष्टी ही अज्ञानी असते; केवळ ईश्वरच सर्वकाही जाणतो. – श्रीमाताजी (CWM 16 : 425)

सुरक्षितता

आसक्ती नाही, इच्छा नाहीत, आवेग नाहीत, पसंती-नापसंती नाही; संपूर्ण समता, अविचल शांती आणि ‘ईश्वरी’ संरक्षणाविषयी परिपूर्ण श्रद्धा : हे सारे असेल तर तुम्ही सुरक्षित असता; नसेल तर तुम्ही भयग्रस्त असता. आणि जोपर्यंत तुम्ही सुरक्षित नसता, तोपर्यंत कोंबडीची पिल्ले ज्याप्रमाणे आपल्या आईच्या पंखाखाली आसरा घेतात, तसे करणे अधिक चांगले ! – श्रीमाताजी (CWM 03 : 48)

भीती – चेतनेची अधोगती

शिक्षेच्या भीतीने नव्हे तर, आपण खोडसाळ आहोत हे समजल्यामुळे खजील होऊन, लहान मुलाचा खोडसाळपणा बंद झाला पाहिजे. त्यामुळे त्याची खरी प्रगती होते. भीतीमुळे जर त्याचा खोडसाळपणा बंद होणार असेल तर, त्यामुळे मानवी चेतनेमधून ते मूल एक पायरी खाली घसरते कारण भीती ही चेतनेची अधोगती आहे. – श्रीमाताजी (CWM 12 : 362)

दुहेरी जीवन

एखाद्याने आपले एक पाऊल एकीकडे आणि दुसरे पाऊल दुसरीकडेच तर पडत नाही ना, आपापल्या मार्गाने जाणाऱ्या दोन वेगवेगळ्या बोटींमध्ये तर आपण उभे नाही ना, याची काळजी घ्यावयास हवी. श्रीअरविंदांचे असे सांगणे आहे की, व्यक्तीने ‘दुहेरी जीवन’ जगता कामा नये. त्याने एक तर ही गोष्ट सोडावयास हवी किंवा ती – एकाच वेळी दोन्हींचे अनुसरण करता येत […]

साधना आणि बाह्य जीवन

पूर्णयोगा’मध्ये साधना आणि बाह्य जीवन यांमध्ये कोणताही भेद नाही; दैनंदिन जीवनात प्रत्येक क्षणी ‘सत्या’चा शोध घेतलाच पाहिजे आणि तो आचरणात आणलाच पाहिजे. – श्रीमाताजी (White roses : 33)