Entries by श्रीमाताजी

आकांक्षा

विचारशलाका ०६ श्रीअरविंद यांनी एके ठिकाणी असे सांगितले आहे की, “प्रकाशाला बळाने खाली खेचायचा प्रयत्न करणे हे खचितच चुकीचे आहे. ‘अतिमानस’ ही अट्टाहासाने खाली खेचण्याची गोष्ट नाही. योग्य वेळ येईल तेव्हा, ते स्वत:हून आपलेआपणच खुले होईल; पण हे घडून येण्यापूर्वी, बरेच काही करावे लागेल आणि ते मात्र धीराने व कोणतीही घाईगडबड न करता करावे लागेल.” […]

आध्यात्मिक अनुभव

विचारशलाका – ०५ साधक : आध्यात्मिक अनुभव यावेत अशी आकांक्षा आम्ही बाळगली पाहिजे का? श्रीमाताजी : आध्यात्मिक अनुभव यावेत अशी आकांक्षा बाळगण्यापेक्षा, प्रगतीची आस बाळगणे किंवा अधिक सचेत, अधिक जागृत होण्याविषयी आस बाळगणे किंवा चांगले काही करावे, चांगले बनावे अशी आकांक्षा बाळगणे अधिक सुज्ञपणाचे आहे, असे मला वाटते. कारण आध्यात्मिक अनुभव यावेत अशी आकांक्षा बाळगण्यातून, […]

सर्व जीवन म्हणजे योगच

आध्यात्मिकता ४९ ‘सर्व जीवन म्हणजे योगच आहे’ ०१) पहिला आणि कदाचित सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की, मन हे आध्यात्मिक गोष्टींचे आकलन करण्यासाठी सक्षम नसते… आणि म्हणून या मार्गावर प्रगत व्हायचे असेल तर, सर्व मानसिक मतमतांतर आणि प्रतिक्रिया यांपासून स्वतःला दूर राखणे अगदी अनिवार्य असते. ०२) सुखसोयी, समाधान, मौजमजा, आनंद यासाठीची सर्व धडपड सोडून द्या. केवळ […]

पूर्णयोगाचा प्रारंभ

आध्यात्मिकता ४८ माणसं बाह्य गोष्टींमध्येच गुंतलेली असतात. म्हणजे असे की, त्यांची चेतना, अधिक गहन सत्य, ईश्वयरी ‘उपस्थिती’ यांच्या शोधासाठी अंतर्मुख होण्याऐवजी, बाह्य गोष्टींकडेच वळलेली असते – म्हणजे व्यक्ती जीवनात ज्या गोष्टी बघते, जाणते, करते त्या गोष्टींकडेच तिची चेतना वळलेली असते. तुम्ही जे काही करत असता त्यामध्ये व्यग्र असता, तुमच्या अवतीभोवती वावरणाऱ्या माणसांमध्ये, तुम्ही ज्या वस्तू […]

कृतज्ञतेची ज्योत

आध्यात्मिकता ४६ सर्व अहंकार आणि सर्व अंधकार नाहीसा करण्यासाठी, कृतज्ञतेची शुद्ध, उबदार, मधुर आणि तेजस्वी ज्योत आपल्या हृदयामध्ये कायमच प्रज्वलित असली पाहिजे. साधकाला त्याच्या उद्दिष्टाप्रत घेऊन जाणारा जो परमेश्वर, त्या ‘परमेश्वराच्या कृपे’बद्दल कृतज्ञतेची ज्योत कायमच तेवत राहिली पाहिजे. व्यक्ती जितकी अधिक कृतज्ञ राहील, जेवढी तिला ‘ईश्वरी कृपे’च्या कृतीची अधिक जाण होईल आणि त्याबद्दल ती जेवढी […]

चेतना विशाल कशी करावी ?

आध्यात्मिकता ४५ (चेतना विशाल कशी करावी, या प्रश्नावर उत्तर देताना श्रीमाताजींनी आधी काही मार्ग सांगितले आणि त्या आता येथे त्याचा बौद्धिक मार्ग सांगत आहेत…) तुम्हाला जेव्हा एखाद्या गोष्टीचा कंटाळा आलेला असतो, तुम्हाला एखादी गोष्ट वेदनादायी किंवा अगदी असुखद वाटत असते, अशा वेळी जर तुम्ही काळाच्या (time) अनंततेचा आणि अवकाशाच्या (space) असीमतेचा विचार करायला सुरुवात केलीत, […]

प्रकाश आणि काळोख याचा निर्णय

आध्यात्मिकता ४४ (तिमिर जावो….भाग ०३)   …स्वतःमधील द्वंद्व दिसण्यासाठी, ते लक्षात येण्यासाठी, व्यक्ती पुरेशी निर्मळ आणि प्रामाणिक असली पाहिजे. सहसा व्यक्ती या गोष्टींकडे पुरेसे लक्ष देत नाही. व्यक्ती या टोकाकडून त्या टोकाकडे हेलकावत राहते. म्हणजे अगदी साध्या शब्दांत सांगायचे तर, तुम्ही असे म्हणू शकता की, एखाद्या दिवशी मी चांगला असतो, आणि दुसऱ्या दिवशी मी वाईट […]

छायेपासून स्वत:ची सुटका

आध्यात्मिकता ४३ (तिमिर जावो….भाग ०२) (तुमच्या व्यक्तिमत्त्वामधील) ही काळोखी बाजू ज्याक्षणी तुम्हाला आढळून येते, त्याक्षणी तुम्ही तिचे नीट निरीक्षण केलेत आणि “हा मी आहे,” असे म्हणाला नाहीत, आणि त्याऐवजी जर तुम्ही असे म्हणालात की, “नाही, ही माझी काळी छाया आहे, माझ्यामधून हा अंश बाहेर काढून टाकलाच पाहिजे,” आणि मग त्या काळोख्या भागावर प्रकाश टाकलात, आणि […]

स्वत:ला ओळखा

आध्यात्मिकता ४२ आपल्याच व्यक्तिमत्त्वामध्ये प्रकाशमय आणि अंधकारमय अशा दोन बाजू असतात. त्यातील अंधकारमय बाजूपासून स्वत:ची सोडवणूक कशी करून घ्यावी हे श्रीमाताजी येथे सांगत आहेत. ‘तिमिर जावो…’ या तीन भागांच्या मालिकेद्वारे आपण तो विचार समजावून घेऊ. (तिमिर जावो… भाग ०१) साधक : व्यक्तीला जेव्हा अशी जाणीव होते की, आपल्यामधील अमुक एक घटक आपल्याला मूर्खपणाच्या गोष्टी करायला […]

वेळ असा व्यतीत करा.

आध्यात्मिकता ४१ (उत्तरार्ध) …वेळ मुळातच इतका कमी असतो, आणि तो अधिकच कमी असल्याचे तुमच्या लक्षात येते. जीवनाच्या अखेरीस तुमच्या लक्षात येते की, मिळालेली संधी तुम्ही तीनचतुर्थांश वेळेला गमावलेली आहे – अशा वेळी तुम्ही मिळालेल्या वेळातच दुप्पट काम करू पाहता पण त्यानेही काही उपयोग होत नाही – त्यापेक्षा नेमस्तपणे, समतोल, चिकाटीने, शांतपणे काम करत राहणे आणि […]