Entries by श्रीअरविंद

प्रतिक्रिया आणि साधना

कर्म आराधना – १८ (भगवद्गीता ही प्राणिक इच्छांवर मानसिक नियंत्रणाचा नियम सांगून थांबत नाही, तर ती अमर्त्य आत्म्याची अचलता प्रतिपादित करते.) सर्व परिणामांबाबत, सर्व प्रतिक्रियांबाबत, सर्व घटनांबाबत ‘मनाची आणि हृदयाची संपूर्ण समता’ ही कसोटी असल्याचे भगवद्गीता सांगते. सद्भाग्य असो वा दुर्भाग्य, सन्मान असो वा अपमान, कीर्ती असो वा दुष्कीर्ती, जय असो वा पराभव, सुखद असोत […]

ईश्वरात राहावे, अहंभावात राहू नये

कर्म आराधना – १७ आपल्या प्रयत्नासाठी काही अटी आहेत आणि त्या अटी एका आदर्शाकडे निर्देश करतात. हा आदर्श पुढील सूत्रांत व्यक्त करता येईल. ‘ईश्वरा’त राहावे, अहंभावात राहू नये; लहानशा, अहंभावी जाणिवेत राहून नव्हे; तर ‘सर्वात्मक व सर्वातीत’ पुरुषाच्या चेतनेत राहून, विशाल पायावर ठामपणे सुस्थिर होऊन जीवन जगावे. सर्व प्रसंगी व सर्व जिवांशी पूर्ण समत्वबुद्धीने वागावे; […]

श्रीअरविंद यांनी केलेली ‘कर्मा’ची व्याख्या

कर्म आराधना – १६ अज्ञान आणि अहंभावातून केलेल्या कृतीला, जी कृती अहंकाराच्या समाधानासाठी आणि राजसिक इच्छेच्या प्रेरणेपोटी केली जाते त्या कृतीला मी ‘कर्म’ असे संबोधत नाही. अज्ञानाचा जणू शिक्काच असणाऱ्या अहंकार, राजसिकता आणि इच्छावासना यांपासून सुटका करून घेण्याचा संकल्प असल्याखेरीज ‘कर्मयोग’ घडूच शकत नाही. परोपकार किंवा मानवतेची सेवा किंवा तत्सम अनेकानेक गोष्टी – नैतिक किंवा […]

शुद्ध आंतरात्मिक साधन

कर्म आराधना – ०५ शक्ती मिळविण्यासाठी जिवाचा आटापिटा करण्याची गरज नाही; तिच्या प्राप्तीची आकांक्षा बाळगता कामा नये. अथवा ती शक्ती प्राप्त झाल्याचा अहंकारदेखील असता कामा नये. व्यक्तीला एखादी शक्ती वा अनेक शक्ती प्राप्त झाल्या तरी, तिने त्या स्वतःच्या आहेत असे समजता कामा नये तर, त्या ‘ईश्वरी’ कार्यासाठी ‘ईश्वरा’ने दिलेल्या देणग्या आहेत, असे समजले पाहिजे. …(ईश्वराने […]

निर्दोष सेवक बनण्यासाठीची आवश्यक अट

कर्म आराधना – ०४ सर्व प्रकारच्या अहंभावात्मक हेतुंपासून मुक्त असणे, वाणी व कृतीतील सत्यत्वाविषयी सतर्क असणे, स्वतःची इच्छा आणि स्वमताग्रह नसणे तसेच सर्व गोष्टींविषयी सावध असणे ही (ईश्वराचा) निर्दोष सेवक बनण्यासाठीची आवश्यक अट आहे. – श्रीअरविंद (CWSA 29 : 245)

श्रद्धायुक्त आत्मदान

कृतज्ञता – १३ आपल्या अस्तित्वाची प्रत्येक कृती, प्रत्येक क्षण म्हणजे त्या ‘शाश्वता’प्रत सातत्यपूर्वक चाललेले श्रद्धायुक्त आत्मदान असले पाहिजे. आपल्या साऱ्या कृती, मग त्या अगदी महान, असामान्य आणि उदात्त असल्या काय, नाहीतर अगदी किरकोळ, अगदी सर्वसामान्य आणि क्षुल्लक असल्या काय, त्या साऱ्या कृती या ‘आत्मनिवेदित कृती’ (consecrated acts) म्हणून सादर केल्या पाहिजेत. आपल्या व्यक्तिगत प्रकृतीने अशा […]

यज्ञबुद्धीने केलेले अर्पण

कृतज्ञता – १२ (श्रीअरविंद येथे यज्ञबुद्धीने केलेल्या अर्पणाबद्दल सांगत आहेत.) हे अर्पण कोणा व्यक्तींना केलेले असेल, ‘ईश्वरी शक्तीं’ना केलेले असेल, ते ‘विश्वात्मक ईश्वरा’ला केलेले असेल किंवा विश्वातीत असणाऱ्या ‘परमेश्वरा’ला केलेले असेल. त्याचप्रमाणे अर्पण केलेली वस्तू म्हणजे एखादे पान असेल, फुल असेल, पाणी असेल, मुठभर धान्य असेल, अन्नधान्य असेल, किंवा आपल्यापाशी जे जे काही आहे त्या […]

कृतज्ञता – एक आंतरात्मिक भावना

कृतज्ञता – ०६ ‘कृतज्ञता’ ही एक आंतरात्मिक भावना आहे आणि जे जे काही आंतरात्मिक असते ते आत्म्याला विकसित होण्यासाठी साहाय्य करते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहता भावनांमध्ये गैर असे काही नाही. फक्त एवढेच की त्या भावना (अध्यात्म) मार्गावरील बंधन ठरता कामा नयेत. – श्रीअरविंद (SABCL 24 : 1768)

चेतना, घडणसुलभता आणि नि:शेष समर्पण

साधनेची मुळाक्षरे – ३८ तुम्ही मानवी प्रकृतीचे रूपांतरण गतिमान दिव्य प्रकृतीमध्ये करू इच्छित असाल तर, कोणतीही कुरकूर न करता, किंवा कोणताही प्रतिकार न करता, स्वत:ला ‘श्रीमाताजीं’च्या व त्यांच्या ‘शक्तीं’च्या हाती सोपवा आणि त्यांना त्यांचे कार्य तुमच्यामध्ये कोणत्याही अडथळ्याविना करू द्या. चेतना, घडणसुलभता (Plasticity) आणि नि:शेष समर्पण ह्या तीन गोष्टी तुमच्याकडे असल्याच पाहिजेत. ‘श्रीमाताजी’ आणि त्यांच्या […]

,

वासनात्मा आणि खरा आत्मा

साधनेची मुळाक्षरे – ३६ मनुष्याचे पृष्ठस्तरीय हृदय हे पशुहृदयाप्रमाणेच प्राणसुलभ भावनांचे, विकारांचे असते. पशुहृदयाहून या मानवी हृदयाचा विकास अधिक विविधतेचा असतो, इतकेच. या हृदयाच्या भावनांवर स्वार्थी विकारांचे, आंधळ्या सहज-प्रवृत्तींचे आणि दोषपूर्ण, विकृत, बरेचदा अधोगतीच्या क्षुद्र जीवनप्रेरणांचे वर्चस्व असते. हे हृदय प्राणशक्तीच्या पतित कामनांनी, वासनांनी, क्रोधविकारांनी, क्षुद्र लोभांनी, तीव्र हव्यासांनी, हीन दीन मागण्यांनी वेढलेले आणि अंकित […]