Entries by श्रीअरविंद

प्रामाणिकपणा – ४६

प्रामाणिकपणा – ४६ एखाद्या व्यक्तीने भूतकाळात कितीही ठोकरा खाल्लेल्या असल्या किंवा कितीही चुका केलेल्या असल्या तरीसुद्धा, जर ती व्यक्ती ‘ईश्वरा’च्या निवासाचे दरवाजे अगदी प्रामाणिकपणे ठोठावेल तर, तिच्यासाठी ते दरवाजे कधीच बंद नसतात. मानवी गुण आणि मानवी दोष म्हणजे अंतर्यामी असणाऱ्या ‘ईश्वरी’ तत्त्वावरील तेजस्वी व काळोखी आवरणे असतात. हे ईश्वरी तत्त्व जेव्हाकधी त्या आवरणाचा भेद करते […]

प्रामाणिकपणा – ४३

प्रामाणिकपणा – ४३ ‘ईश्वरी कृपे’बाबत शंकाच असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक असेल तर तो ‘ईश्वरा’पर्यंत पोहोचेलच हे अगदी खरे आहे. परंतु याचा अर्थ असा नव्हे की तो अगदी लगेचच, अगदी सहजपणे, विनाविलंब ‘ईश्वरा’पर्यंत पोहोचेल. तुमची अडचण इथेच आहे, तुम्ही ‘ईश्वरा’साठी पाच वर्षे, सहा वर्षे अशी काहीतरी एक मुदत निश्चित करता, आणि तुम्हाला कोणताच परिणाम […]

प्रामाणिकपणा – ४१

प्रामाणिकपणा – ४१ कोणत्या गुणामुळे व्यक्ती (योगासाठी) सुपात्र ठरते किंवा कोणत्या गुणाच्या अभावामुळे ती अपात्र ठरते हे तसे सांगणे कठीण आहे. एखाद्या व्यक्तीमध्ये तीव्र कामवासना असेल, शंकाकुशंका असतील, बंडखोर वृत्ती असेल, आणि असे असूनदेखील तिला अंतिमतः यश मिळू शकेल, तर दुसरी एखादी व्यक्ती अपयशी ठरू शकेल. मात्र, एखाद्या व्यक्तीकडे मूलभूत प्रामाणिकपणा असेल, सर्व गोष्टींवर मात […]

प्रामाणिकपणा – ४०

प्रामाणिकपणा – ४० वाचन आणि अभ्यास या गोष्टी मनाची पूर्वतयारी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात, पण त्या गोष्टी म्हणजेच काही ‘योग’मार्गामध्ये प्रवेश करण्याची सर्वोत्तम साधने ठरू शकत नाहीत. अंतरंगातून होणारे आत्मार्पण (self-dedication) हे उत्तम साधन असते. तुम्ही श्रीमाताजींच्या चेतनेशी एकरूप झाले पाहिजे, मन, हृदय आणि ‘संकल्प’ यांमधील प्रामाणिक आत्मनिवेदन (self-consecration) ही त्यासाठीची साधने असतात. श्रीमाताजींकडून देण्यात […]

प्रामाणिकपणा – २९

प्रामाणिकपणा – २९ हृदयामध्ये प्रामाणिकपणा असेल आणि हेतू निःस्वार्थी असेल आणि वरून (ईश्वरी शक्तीकडून) येणाऱ्या साहाय्याप्रत खुलेपणा असेल तर, कितीही मोठ्या अडचणी आल्या तरी त्यांवर मात करता येते किंवा कालांतराने त्यांमध्ये बदल करता येतो. – श्रीअरविंद [CWSA 35 : 528]

प्रामाणिकपणा – २७

प्रामाणिकपणा – २७ संपूर्ण प्रामाणिकपणा ही अंतःकरणाच्या शुद्धीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. स्वतःबद्दल कोणतीही बढाई मारता कामा नये, ‘ईश्वरा’पासून, स्वतःपासून किंवा ‘सद्गुरू’पासून काहीही लपवून ठेवता कामा नये, स्वतःच्या वृत्ती-प्रवृत्तींचे थेट निरीक्षण केले पाहिजे आणि त्यांना सुयोग्य करण्याची साधीसरळ इच्छा बाळगली पाहिजे. या गोष्टींना वेळ लागला तरी काही हरकत नाही; पण ‘ईश्वर’प्राप्ती हेच आपले जीवित-कार्य आहे […]

प्रामाणिकपणा – ०७

प्रामाणिकपणा – ०७ [स्वत:चीच फसवणूक करणारा प्राणिक अहंकार, मानसिक उद्धटपणा, श्रेष्ठत्वाची चुकीची भावना, पांडित्य-प्रदर्शन, शारीरिक अस्तित्वामध्ये असणारी तमोमय जडता] या गोष्टींपासून सुटका करून घेण्यासाठी अस्तित्वाच्या सर्व अंगांमध्ये संपूर्ण केंद्रवर्ती प्रामाणिकपणा असणे ही एकच अट असते. आणि त्याचा अर्थ असा की, ‘परमसत्याचा’ निरपवाद आग्रह आणि परमसत्याविना दुसरे काहीही नको असणे. मग, कोणतेही समर्थन न करता, स्वयं-आलोचना […]

प्रामाणिकपणा – ०४

प्रामाणिकपणा – ०४ पूर्णतः प्रामाणिक असणे म्हणजे फक्त आणि फक्त दिव्य ‘सत्या’चीच इच्छा बाळगणे; ‘दिव्य माते’प्रत स्वतःला अधिकाधिक समर्पित करणे; या अभीप्सेव्यतिरिक्त असणाऱ्या सर्व वैयक्तिक मागण्या व इच्छा-वासना यांचा परित्याग करणे; जीवनातील प्रत्येक कृती ही ‘ईश्वरा’लाच अर्पण करणे आणि हे कार्य ‘ईश्वरा’ने दिलेले आहे हे जाणून, कोणताही अहंकार आड येऊ न देता, कार्य करणे; हाच […]

,

कर्म आणि योगसाधना

कर्म आराधना – ५३ कर्म हा योगसाधनेचा एक भाग आहे आणि प्राण व त्याच्या क्रियांमध्ये ‘ईश्वरी उपस्थिती’, ‘प्रकाश’ आणि ‘शक्ती’ अवतरित व्हाव्यात म्हणून त्यांना आवाहन करण्यासाठी कर्म ही एक उत्तम संधी प्रदान करते; कर्मामुळे समर्पणाचे क्षेत्रदेखील विस्तारित होते आणि समर्पणाची संधीही वाढीस लागते. * कर्माच्या माध्यमातून योगसाधना हा पूर्णयोगाच्या साधनेच्या प्रवाहामध्ये प्रवेश करण्याचा सर्वांत सोपा […]

,

अडीअडचणी आणि अपयश यांचे प्रयोजन

कर्म आराधना – ५२ साधकासाठी बाह्य संघर्ष, अडचणी, संकटे या गोष्टी म्हणजे अहंकार आणि रजोगुणात्मक इच्छा यांच्यावर मात करण्याची आणि नि:शेष समर्पण साध्य करून घेण्याची केवळ साधने असतात. व्यक्ती जोपर्यंत यशावर भर देत असते तोपर्यंत ती व्यक्ती अंशतः का होईना पण अहंकारासाठी कर्म करत असते; आणि ते दाखवून देण्यासाठी तसेच पूर्ण समता यावी म्हणून अडीअडचणी […]