Entries by श्रीअरविंद

विवाह आणि साधकजीवन

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (१४) (एका साधकाने ‘मी लग्न करू का?’ असा प्रश्न श्रीअरविंद व श्रीमाताजी यांना विचारला होता, तेव्हा त्याच्या लग्नास संमती देण्यात आली. ती का दिली याचे कारण श्रीअरविंदांनी त्याला पत्राने कळविले आहे. त्या पत्रातील हा अंशभाग…) आध्यात्मिक जीवनासाठीची संपूर्ण तयारी होण्यापूर्वीच व्यक्तीने लौकिक जीवनाचा त्याग करणे उपयोगाचे नाही. असे करणे म्हणजे विविध घटकांमधील (मन, […]

सांसारिक जीवन – अनुभवाचे क्षेत्र

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (१३) उच्चतर चेतनेमध्ये उन्नत होणे आणि केवळ सामान्य प्रेरणांनिशी नव्हे तर, त्या उच्चतर चेतनेमध्ये राहून जीवन जगणे हे, येथे (श्रीअरविंद आश्रमामध्ये) आचरल्या जाणाऱ्या योगसाधनेचे उद्दिष्ट आहे. यामध्ये चेतनेच्या परिवर्तनाप्रमाणेच जीवनाचे परिवर्तनही अपेक्षित आहे. सामान्य जीवनापासून संबंध तोडता येतील अशी परिस्थिती सर्वांनाच उपलब्ध असते असे नाही; आणि म्हणून अनुभवाचे एक क्षेत्र आणि साधनेतील प्राथमिक […]

पूर्णयोगाची मागणी

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (१२) तुम्ही तुमचे जीवन इतर कोणत्याही गोष्टीसाठी नव्हे तर, ‘दिव्य-सत्य’शोधनाच्या अभीप्सेसाठी आणि त्या ‘सत्या’चे मूर्त स्वरूप बनण्याच्या अभीप्सेसाठी पूर्णतया निष्ठापूर्वक अर्पित करावे, ही या योगाची (पूर्णयोगाची) मागणी आहे. तुमचे जीवन (एकीकडे) ‘ईश्वरा’मध्ये आणि (दुसरीकडे) ज्या गोष्टीचा ‘सत्या’च्या शोधनाशी काहीही संबंध नाही अशा कोणत्यातरी बाह्य ध्येयामध्ये आणि कार्यामध्ये विभागणे या गोष्टीला येथे मान्यता नाही. […]

पूर्णयोगाचे ध्येय

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (१०) केवळ ‘अतिमानव’ बनण्याच्या कल्पनेने या ‘योगा’कडे (पूर्णयोगाकडे) वळणे ही प्राणिक अहंकाराची एक कृती ठरेल आणि ती या योगाचे मूळ उद्दिष्टच निष्फळ करेल. जे कोणी त्यांच्या सर्व जीवनव्यवहारामध्ये असे उद्दिष्ट ठेवतात त्यांना निरपवादपणे आध्यात्मिक आणि अन्य प्रकारची दुःखं सहन करावी लागतात. प्रथम विभक्तकारी अहंकार (separative ego) दिव्य चेतनेमध्ये विलीन करून, त्याद्वारे दिव्य चेतनेमध्ये […]

पूर्णयोगाचे उद्दिष्ट

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (०९) ‘ईश्वरी उपस्थिती’ आणि ‘दिव्य चेतने’मध्ये प्रवेश करणे आणि त्याने परिव्याप्त होणे हे या योगाचे (पूर्णयोगाचे) उद्दिष्ट आहे; ‘ईश्वरा’वर केवळ ‘ईश्वरा’साठीच प्रेम करणे, आपली प्रकृती ही ‘ईश्वरा’च्या प्रकृतीशी मिळतीजुळती करणे, मेळविणे आणि आपली इच्छा, आपली कर्मे, आपले जीवन हे सारे ‘ईश्वरा’चे साधन बनवणे हे या योगाचे उद्दिष्ट आहे. महान योगी बनणे किंवा अतिमानव […]

पूर्णयोगाचे तत्त्व

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (०८) (१९३७ च्या सुमारास एक साधक पूर्णयोगाची साधना अंगीकारु इच्छित होता, त्यासाठी तो आश्रमात राहू इच्छित होता. श्रीअरविंद यांनी आपल्या बुद्धीच्या आधारे स्वत:चे आध्यात्मिकीकरण करून घेतले आहे तसेच त्यांनी बुद्धिपूर्वक स्वत:चे दिव्यत्वात रुपांतर करून घेतले आहे, असे त्याचे म्हणणे होते. या विचाराने भारावलेला तो साधक ‘पूर्णयोगा’कडे वळू इच्छित होता. श्रीअरविंद यांनी त्याला त्याच्या […]

साधना म्हणजे…

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (०७) (काव्य, ग्रंथ-वाचन, सामाजिक संपर्क इत्यादी प्रत्येक गोष्टींचे निश्चितपणे काही महत्त्व असते पण साधकाचा मुख्य भर साधनेवर असला पाहिजे आणि त्याला पूरक ठरतील अशा इतर सर्व गोष्टी असल्या पाहिजेत… हे श्रीअरविंद एका साधकाला सांगत आहेत. ते सांगत असताना ‘साधना म्हणजे काय’ हे त्यांनी स्पष्ट केले आहे.) साधना हीच मुख्य गोष्ट असली पाहिजे आणि […]

साधनेचे उद्दिष्ट

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (०६)   (मनुष्याने) मानवजातीला उपयुक्त ठरावे ही पाश्चात्त्यांकडून उसनी घेतलेली संकल्पना आहे आणि त्यामुळे झालेला हा जुनाच गोंधळ आहे. हे स्पष्टच आहे की, मानवजातीला ‘उपयुक्त’ ठरण्यासाठी ‘योगा’ची आवश्यकता नाही. जो कोणी मानवी जीवन जगत असतो तो या ना त्या प्रकारे मानवजातीला उपयुक्तच ठरत असतो.   ‘योग’ हा ईश्वराभिमुख असतो, मनुष्याभिमुख नाही. ‘दिव्य अतिमानसिक […]

‘ईश्वरा’चा शोध

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (०४) उत्तरार्ध आपल्या अंतरंगातील आध्यात्मिक ‘सत्य’ जसजसे वृद्धिंगत होत जाते तसतसे ‘ईश्वरी प्रकाश’ व ‘सत्य’, ‘ईश्वरी शक्ती’ आणि ‘ऊर्जा’, ईश्वरी ‘विशुद्धता’ व ‘शांती’ आपल्यामध्ये कार्य करत आहेत; आपल्या कर्मांवर तसेच आपल्या चेतनेवर त्या कार्य करत आहेत; आपल्यामधील हीणकसपणा काढून, त्या जागी ‘आत्म’रूपी विशुद्ध सोन्याची प्रस्थापना करून, ‘ईश्वरी’ प्रतिमेमध्ये आपली पुनर्रचना घडविण्यासाठी आपल्या कर्मांचा […]

‘ईश्वरा’चा शोध

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (०३) पूर्वार्ध वास्तविक, आध्यात्मिक ‘सत्या’साठी आणि आध्यात्मिक जीवनासाठी केल्या जाणाऱ्या धडपडीचे, उपासनेचे आद्य कारण ‘ईश्वरा’चा शोध हेच आहे; हीच एकमेव आवश्यक गोष्ट आहे आणि त्या व्यतिरिक्त बाकी सारे शून्यवत् आहे. आणि एकदा का ‘ईश्वरा’चा शोध लागला की मग ‘त्या’चे आविष्करण करणे – म्हणजे, सर्वप्रथम आपल्या मर्यादित चेतनेचे रूपांतर ‘दिव्य चेतने’मध्ये करणे; अनंत ‘शांती’, […]