Entries by श्रीअरविंद

साधना, योग आणि रूपांतरण – २६७

साधना, योग आणि रूपांतरण – २६७ प्राणाचे रूपांतरण कृती ‘ईश्वरा’र्पण करणे आणि ते करताना त्यामध्ये जी प्राणिक अडचण उद्भवते त्याविषयी सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की, ही अडचण टाळणे शक्य नसते. तुम्हाला त्यामधून जावेच लागेल आणि त्यावर विजय मिळवावा लागेल. कारण ज्या क्षणी तुम्ही प्रयत्न करू लागता त्याक्षणी, या परिवर्तनाला विरोध करण्यासाठी, प्राण त्याच्या […]

प्राणाचे स्वाहाकरण

साधना, योग आणि रूपांतरण – २६६ प्राणाचे रूपांतरण संपूर्ण प्राणिक प्रकृतीचे शुद्धीकरण व्हावे आणि सर्व अहंभावात्मक इच्छावासना व आवेग नाहीसे होऊन, ‘ईश्वरी संकल्पा’शी सुसंगत असतील तेवढ्याच शुद्ध, सात्त्विक वृत्तीप्रवृत्ती शिल्लक राहाव्यात यासाठी, संपूर्ण प्राणिक प्रकृती आणि तिच्या वृत्तीप्रवृत्ती ‘ईश्वरा’ला अर्पण करणे म्हणजे प्राणाचे स्वाहाकरण (vital consecration) होय. * साधक : ‘प्राणाचे स्वाहाकरण’ म्हणजे काय ? […]

साधना, योग आणि रूपांतरण – २६५

साधना, योग आणि रूपांतरण – २६५ प्राणाचे रूपांतरण प्राणाला जबरदस्तीने काही करायला भाग पाडणे शक्य असले तरी तसे करणे सोपे नसते. सातत्याने अत्यंत मनःपूर्वकतेने प्राणाला पटवून सांगणे आणि त्याच्यामध्ये परिवर्तन घडवून आणणे अधिक सोपे असते. परंतु असे करण्याच्या या मानसिक पद्धतीमध्ये, प्राण हा बरेचदा स्वतःच्या कोणत्यातरी फायद्यासाठी आध्यात्मिक आदर्शाला स्वतःहून जोडून घेतो, हे खरे आहे. […]

साधना, योग आणि रूपांतरण – २६४

साधना, योग आणि रूपांतरण – २६४ प्राणाचे रूपांतरण तुमच्यामध्ये परिवर्तन व्हावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही प्रथमतः तुमच्या प्राणिक अस्तित्वामधील दोषांपासून निर्धारपूर्वक, चिकाटीने सुटका करून घेतली पाहिजे. भलेही मग ते करणे कितीही अवघड असो किंवा त्याला कितीही वेळ लागो, सदासर्वकाळ ‘ईश्वरा’च्या साहाय्यासाठी आवाहन करत राहा आणि स्वतःला पूर्णपणे प्रामाणिक होण्यासाठी नेहमी प्रवृत्त करा. […]

साधना, योग आणि रूपांतरण – २६३

साधना, योग आणि रूपांतरण – २६३ प्राणाचे रूपांतरण बाह्यवर्ती प्राणाच्या शुद्धीकरणासाठी बाह्य शिस्तीची आवश्यकता असते, हे खरे आहे. अन्यथा तो अस्वस्थ आणि लहरी, कल्पनाविलासात रमणारा असा राहतो आणि तो त्याच्या स्वतःच्या भावावेगांचा गुलाम बनून राहतो. आणि त्यामुळे, अविचल आणि स्थायी अशी उच्चतर चेतना तेथे दृढपणे टिकून राहावी यासाठी तेथे कोणताही पाया बांधता येत नाही. * […]

साधना, योग आणि रूपांतरण – २६२

साधना, योग आणि रूपांतरण – २६२ प्राणाचे रूपांतरण तुमच्यामध्ये जर निष्काळजीपणा असेल तर येथून पुढे तुम्ही तुमच्या सर्व कृतींमध्ये सचेत (conscious) होण्यास शिकलेच पाहिजे. तसे केलेत तर मग प्राणिक वृत्तीप्रवृत्ती तुम्हाला फसवू शकणार नाहीत किंवा कोणते फसवे रूप घेऊन तुमच्या समोर येऊ शकणार नाहीत. या प्राणिक वृत्तीप्रवृत्तींचे निरीक्षण करण्यासाठी आणि त्या जशा आहेत तशा त्या […]

साधना, योग आणि रूपांतरण – २६१

साधना, योग आणि रूपांतरण – २६१ प्राणाचे रूपांतरण प्राणाचे शुद्धीकरण ही सहसा यशस्वी साधनेसाठी आवश्यक असणारी अट आहे असे मानले जाते. प्राणाचे शुद्धीकरण झालेले नसतानाही व्यक्तीला काही अनुभव येऊ शकतात पण चिरस्थायी साक्षात्कारासाठी, प्राणिक गतिविधींपासून पूर्णपणे अलिप्तता असणे हे तरी किमान आवश्यक असते. * ‘क्ष’ ने जे जाळे पसरले होते त्या जाळ्यात तुम्ही अडकलात ही […]

साधना, योग आणि रूपांतरण – २६०

साधना, योग आणि रूपांतरण – २६० प्राणाचे रूपांतरण साधनेसाठी लागणारा अविचल आणि समतोल पाया म्हणजे अशी एक अवस्था असते की जिच्यामध्ये अनुभवाच्या अपेक्षेने उंचबळून येणेही नसते किंवा निष्क्रिय किंवा अर्ध-निष्क्रिय अशी निराश स्थिती देखील नसते. या दोन्हीमध्ये साधक हेलकावे खात नसतो. तर तो प्रगती करत असला किंवा तो अडचणीमध्ये असला तरीही, या कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याच्या […]

साधना, योग आणि रूपांतरण – २५९

साधना, योग आणि रूपांतरण – २५९ प्राणाचे रूपांतरण पृथ्वी-चेतनेला परिवर्तन नको असते आणि त्यामुळे वरून जे काही अवतरित होते त्यास ती नकार देते. आत्तापर्यंत ती नेहमीच हे असे करत आली आहे. ज्यांनी योगाचे आचरण करण्यास सुरुवात केली आहे ते जर स्वतःस उन्मुख करतील आणि त्यांच्या कनिष्ठ प्रकृतीमध्ये परिवर्तन करण्यास राजी होतील तरच पृथ्वी-चेतनेमधील ही अनिच्छा […]

साधना, योग आणि रूपांतरण – २५८

साधना, योग आणि रूपांतरण – २५८ प्राणाचे रूपांतरण साधकांना ज्या शंका येतात त्या खऱ्या मनाकडून येण्याऐवजी बरेचदा प्राणामधून उदय पावतात. जेव्हा प्राण चुकीच्या मार्गाने जातो किंवा तो संकटग्रस्त किंवा निराशाग्रस्त असतो, अशा वेळी शंकाकुशंका यायला लागतात आणि त्या त्याच रूपात, त्याच शब्दांमध्ये पुन्हापुन्हा व्यक्त होत राहतात. मनाला ती गोष्ट स्पष्ट पुराव्याच्या आधारे किंवा बौद्धिक उत्तराने […]